Eknath Shinde On Uddhav Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: जोपर्यंत मी रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde On Uddhav Thackeray: कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले, पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे. तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde On Uddhav Thackeray:

>> अभिजित देशमुख

कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले, पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे. तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.

संसदेत श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण हनुमान चालीसा पठण केली. खासदार शिंदे यांना हनुमान चालीसा येते. मात्र मागच्या सरकारमध्ये हनुमान चालीसा बोलण्यास विरोध झाला. हनुमान चाळीसाला विरोध करनाऱ्यांना आता राम भक्त हनुमान भक्त जागा दाखवतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्या अहवालाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी फिर एक बार श्रीकांत शिंदे खासदार असं संकल्प निश्चय केलाय. याच मतदारसंघातून श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जाणार, असे ते म्हणाले.

डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह, भाजपा आमदार कुमार आयलानी , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील,मनसे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. स्लाईडच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विकास कामांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामाबाबत त्यांचं कौतुक केलं/ तसेच विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी तिलांजली द्या असा आवाहन केलं. श्रीकांत शिंदे यांना खासदार करण्यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करणार, श्रीकांत शिंदेच खासदार होणार विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT