Dindori Loksabha Constituency News: Saamtv
लोकसभा २०२४

Dindori Loksabha Result: जायंट किलर भास्कर भगरे! केंद्रिय मंत्री भारती पवार यांचा १ लाख मतांनी पराभव; शरद पवारांच्या शिलेदाराचा पराक्रम

Dindori Loksabha Constituency News: दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार केंद्रिय मंत्री भारती पवार यांना जोर का झटका बसला असून शरद पवारांच्या शिलेदाराने त्यांचा तब्बल एका लाखाच्या मतांनी पराभव केला आहे.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक, ता. ४ जून २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार केंद्रिय मंत्री भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी लाखोंच्या मतांनी पराभव करत जायंट किलरची भूमिका निभावली आहे.

राज्यातील लोकस निवडणुकांचे अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रिय राज्यमंत्री भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी तब्बल एका लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार अशी लढत झाली. या लढतीत भास्कर भगरे यांनी सुरूवातीपासून बाजी मारत केंद्रिय राज्यमंत्र्यांचा पराभव करण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, नाशिकसह दिंडोरी परिसरात कांद्याच्या प्रश्नावरुन शेतकऱ्यांची केंद्र सरकारविरोधात नाराजी होती. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णायावरुन शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळाला होता. याचाच सर्वात मोठा फटका भारती पवार यांना बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपचे रावसाहेब दानवेही पराभवाच्या छायेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT