लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून काही ठिकाणी अनपेक्षित निकाल पहायला मिळाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे. भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. काहीवेळ ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाली होती. मात्र त्यानंतर काही त्यानंतर काही वेळातच मतमोजणी सुरू झाली आणि भाजपचे उमेदवार भामरे हे पिछाडीवर गेले तर कॉंग्रेसच्या बच्छाव यांनी आघाडी घेतली होती.
धुळे मतदारसंघ एकेकाळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र भाजपने गेल्या तीन निवडणुकीत यावर कब्जा केला होता. त्यानंतर मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार निश्चितीसाठी मोठा कालावधी लागला होता. अंतिम टप्प्यात दहा दिवस अगोदर डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराजांची मनधरणी करावी लागली. त्यात प्रचारासाठीही त्यांना कमी अवधी मिळाला.
मात्र मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघासह व अन्य पाच मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी ही निवडणूक हातात घेऊन जोमाने प्रचार केला आणि त्याला यश आलं. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात ६८ टक्केहून अधिक २ लाख ५ हजार ७५९ मतदान झालं. त्यात एमआयएम व वंचित आघाडीचे उमेदवार नसल्याने काॅंग्रेसच्या पथ्यावर पडला.
या मतदारसंघात विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष भामरे हे सलग तिसऱ्यांदा नशिब अजमावत रिंगणात उतरले होते. प्रारंभी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या एकतर्फी मतदानामुळे चुरशीची लढत पहायला मिळाली. अखेर शोभा बच्छाव यांचा यांनी सुभाष भामरे यांचा पराभव केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.