Sunil Chavan  Yandex
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार

Sunil Chavan Will join BJP: राज्यात कॉंग्रेसमधील नेत्यांच्या गळतीचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. आता धाराशिवमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार आहे.

Rohini Gudaghe

बालाजी सुरवसे साम टिव्ही प्रतिनिधी, धाराशिव

ऐन निवडणूकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये (Dharashiv News) काँग्रेसला मोठा धक्का आहे. राज्यात कॉंग्रेसमधील नेत्यांच्या गळतीचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. आता धाराशिवमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार आहे. धाराशिवच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहेत.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण भाजपात प्रवेश करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुनील चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार (Dharashiv Politics) आहे. मधुकरराव चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

सुनील चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत, त्याचबरोबर ते जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पदावर देखील राहिले आहेत. धाराशिवमध्ये आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा (Madhukarrao Chavan's son Sunil Chavan) उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार येणार आहे. याचवेळी सुनील चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

धाराशिव मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार पडलं आहे. दिवसेंदिवस कॉंग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. कारण माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.सुनील चव्हाण माजी मंत्री कॉंग्रेस नेते मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. ते महाराष्ट्र (Sunil Chavan Will join BJP) राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक आहे. कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. ते तुळजाभवानी साखर कारखानाचे चेअरमन आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत.

मधुकरराव चव्हाण यांच्या आणि त्यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या सहकार संस्था या डबघाईला आल्या (Maharashtra Politics) आहेत. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, पणनसंस्था या सर्व सहकारी संस्था कर्जात बुडाल्या आहेत. या संस्थावर वर्षांनुवर्षे चव्हाण परिवाराचं वर्चस्व होतं. पण त्या चालवण्यात चव्हाण परिवार अपयशी ठरला आहे. याच संस्थांना वाचवण्यासाठी सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं (Lok Sabha 2024) बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT