declare 4 vidhan sabha constituency critical polling station in baramati demands sharad pawar faction Saam Digital
लोकसभा २०२४

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

या मतदारसंघात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवून उपाययोजना कराव्यात. तसेच, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत.

Siddharth Latkar

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बारामती, दौंड, इंदापूर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चार विधानसभा मतदार संघ संवेदनशील जाहीर करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे इ-मेलद्वारे केली होती.

या संदर्भात मतदारसंघात कोणताही गैरप्रकार घडू नये. मतदारांना त्रास होणार नाही, यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. आचारसंहिता पथके कार्यरत ठेवावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT