Lok Sabha Election 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: हत्या, बलात्कार, द्वेषयुक्त भाषण; पहिल्या टप्प्यातील 16 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे; 42 जागांवर रेड अलर्ट जारी

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 1618 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 16 टक्के म्हणजेच 252 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 1618 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 16 टक्के म्हणजेच 252 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे, ज्यामध्ये 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांवर मतदान होणार आहे. यावेळी सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलनंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एडीआर रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर 10 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सात उमेदवारांवर होत्याचे, 18 जणांवर महिलांवर अत्याचार केल्याचा आणि 35 जणांवर द्वेषपूर्ण भाषणासाठी गुन्हे दाखल आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 77 पैकी 28 उमेदवारांनी आणि 56 पैकी 19 काँग्रेस उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कबुली दिली आहे की, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय जनता दलाबद्दल बोलायचे तर पहिल्या टप्प्यातील चारही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.  (Latest Marathi News)

42 जागांवर रेड अलर्ट जारी

डीएमके, सपा, टीएमसी आणि बीएसपीमधील गुन्हेगारी खटले असलेल्या उमेदवारांची टक्केवारी अनुक्रमे 59, 43, 40 आणि 13 आहे. लोकसभेच्या 102 पैकी 42 जागांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच ज्या जागांवर तीनपेक्षा जास्त उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, अशा जागांवर रेड अलर्ट जारी केला जातो.

एडीआरच्या रिपोर्टनुसार, 1618 उमेदवारांपैकी 450 उमेदवारांकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. भाजपचे 90 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. तर काँग्रेसच्या 88 टक्के उमेदवारांची संपत्ती एक कोटींहून अधिक आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 10 उमेदवार असे आहेत, ज्यांनी आपली कोणतीही मालमत्ता नसल्याचे सांगितले आहे. जर आपण सर्व उमेदवारांच्या सरासरी मालमत्तेबद्दल बोललो तर ती 4.51 कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT