Nana Patole On Vishal Patil
Nana Patole On Vishal Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस करणार कारवाई, नाना पटोले यांनी दिली माहिती

साम टिव्ही ब्युरो

Nana Patole On Vishal Patil:

>> अक्षय गवळी

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस आता कारवाई करणार, अशी माहिती स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे खुप प्रयत्न केलेत. मात्र, त्यांना कुणीतरी फुस लावली आहे. विशाल पाटलांवर कारवाईसाठी प्रदेश काँग्रेसची 25 एप्रिलला बैठक होणार आहे. या बैठकीनंतर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचं स्वरूप स्पष्ट होणार आहे. अकोल्यात डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारसभा आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी यांबाबत माहिती दिली आहे.

विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपलं बंड कायम ठेवलंय. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आणि घेणार नाही, असं ठामपणे सांगितलं आहे. आज पत्रकार परिषद घेत ते म्हणाले आहेत की, 'हा जनतेचा लढा आहे. त्यामुळे माघार हा पर्याय नाही.'

विशाल पाटील म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गेली ९० ते ९५ वर्षे काँग्रेससाठी राबणाऱ्या पक्षाला आणि जिल्ह्याला न्याय देतील अशी अपेक्षा होती. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही. त्यामुळे अत्यंत दु:ख वाटले. त्यानंतरही आशा होत्या की, ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली होती. त्या उमेदवाराला सर्व वस्तुस्थिती समजावून सांगत माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर करतील ही अपेक्षा होती. पण तेही आज झाले नाही. १६ तारखेला कार्यकर्त्यांनी सांगितले होते की माघार हा पर्याय नाही'.

दरम्यान, विशाल पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे आणि त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर विशाल पाटील समर्थकांनी विशाल पाटलांच्या वसंतदादा भवन कार्यालयासमोर एकच जल्लोष केला आहे. हातात लिफाफा घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आहेत. दिसला लिफाफा मार शिक्का आणि आणि विशाल पाटलांच्या विजयाची घोषणाबाजी करण्यात करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT