congress leader yashomati thakur reaction on india alliance success in lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

देशात मोहब्बत की दुकान खुल रही है, इंडिया आघाडीचे सरकार बनणार : यशाेमती ठाकूर (पाहा व्हिडिओ)

congress leader yashomati thakur reaction on india alliance success : महाराष्ट्रसह देशात इंडिया आघाडीला लाेकसभा निवडणुकीत उत्तम यश मिळाले आहे. काॅंग्रेसने महाराष्ट्रात आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

देशात तानाशाह की दुकान बंद हो रहे हैं,और मोहब्बत की दुकान खुली रही है. देशात इंडिया आघाडीचे सरकार बनणार असा ठाम विश्वास आमदार यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केला. देशातील लाेकसभा निवडणुकीच्या निकालात इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर आमदार ठाकूर यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना इंडिया आघाडीला लाेकांनी आपलेसे केल्याबद्दल जनतेचे आभार मानले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले आहे तसेच देशात इंडिया आघाडीने मुसंडी मारली. याबाबत आमदार यशाेमती ठाकूर म्हणाल्या मागच्या दहा वर्षात सत्ताधारी मोठ्या अरेरावीने वागले आहे. सरकार व पक्ष तोडण्याचे प्रयत्न त्यांनी केले. ती कुणालाही आवडले नाही. आम्ही देवाचे आभार मानतो, देवाने आम्हाला साथ दिली.

आमदार ठाकूर पुढं बाेलताना म्हणाल्या अयोध्येमध्ये श्रीरामाने आम्हाला साथ दिली. सर्व देव आमच्या सोबत होते. त्यामुळे देशात इंडिया आघाडीचे सरकार बनणार व संविधान रक्षक या देशावर राज्य करतील व संविधानाच रक्षा करतील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT