BJP National President JP Nadda  Saam TV
लोकसभा २०२४

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Lok Sabha Election 2024: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र विरुद्ध कर्नाटक काँग्रेसने गुन्हा दाखल केला आहे.

Satish Kengar

Congress Vs BJP:

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र विरुद्ध कर्नाटक काँग्रेसने गुन्हा दाखल केला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना धमकावण्यासाठी भाजपने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कर्नाटक भाजपने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरून आता मोठा वाद झाला आहे. या व्हिडिओबाबत काँग्रेसने आरोप केला होता की, या व्हिडिओमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.

यासंदर्भात कर्नाटक काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. ज्यामध्ये कर्नाटक भाजपने शेअर केलेल्या या कथित व्हिडिओद्वारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना धमकावल्याचे सांगण्यात आले होते. एससी/एसटी समाजातील लोकांमध्ये शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ भाजपने पोस्ट केला आहे, असा आरोप काँग्रेसचा आहे.

यासोबतच कर्नाटक काँग्रेसने भाजपवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही केला आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे ॲनिमेशन या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे, जे आचारसंहितेचे उल्लंघन करते. हा व्हिडिओ कर्नाटक भाजपने 4 मे रोजी पोस्ट केला होता.

कर्नाटक काँग्रेसचे मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष रमेश बाबू म्हणाले की, भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांना आरक्षणाच्या टोपलीत अंडी दाखवण्यात आली आहेत. या व्हिडिओमध्ये ॲनिमेटेड स्वरूपात राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाचे आणखी एक अंडे आरक्षणाच्या टोपलीत टाकताना दाखवण्यात आलं आहे. टोपलीत तीन अंडी असताना तीनही फुटतात आणि मुस्लिम समाजाची अंडी मोठी होताना, यात दाखवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT