Prahlad Gunjal Vs Om Birla Saam Tv
लोकसभा २०२४

Congress 6th List: काँग्रेसने 6वी यादी केली जाहीर, ओम बिर्ला यांच्याविरोधात उतरवला तगडा उमेदवार

Congress 6th List Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानमधील 4 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे आणि तामिळनाडूतून एक उमेदवार आहे.

Satish Kengar

Congress 6th List Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानमधील 4 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे आणि तामिळनाडूतून एक उमेदवार आहे. म्हणजेच या यादीत एकूण 5 नावांचा समावेश आहे.

ओम बिर्ला यांच्याविरोधात प्रल्हाद गुंजाळ मैदानात

काँग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रल्हाद गुंजाळ हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांचा सामना भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी होणार आहे. प्रल्हाद गुंजाळ यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजमेरमधून रामचंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच राजसमंदमधून सुदर्शन रावत आणि भिलवाडामधून दामोदर गुर्जर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथून अधिवक्ता रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट देण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोटनिवडणुकीसाठीही उमेदवार केले जाहीर

यासोबतच काँग्रेसने तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत. विलावनकोड जागेवर डॉ. थरहाई कुथबर्ट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

सहाव्या यादीत कोणाला कुठून मिळाली संधी?

  • राजस्थान, अजमेर- रामचंद्र चौधरी

  • राजस्थान, राजसमंद - सुदर्शन रावत

  • राजस्थान, भिलवाडा - डॉ.दामोदर गुर्जर

  • राजस्थान, कोटा - प्रल्हाद गुंजाळ

  • तामिळनाडू, तिरुनेलवेली - रॉबर्ट ब्रुस

दरम्यान, याआधी रविवारी काँग्रेसने पाचवी यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे. जयपूरमधून काँग्रेसचे उमेदवार सुनील शर्मा यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेले प्रताप सिंह खाचरियावास येथून रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून आतापर्यंत एकूण 6 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये एकूण 190 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT