Amol kolhe On Shirur Shirur Constituency saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: शिरूरमधून भुजबळांना उमेदवारी देण्याचा होता प्लॅन; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

Amol Kolhe : शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. भुजबळांनीही याला दुजोरा दिला आहे. पाहूया एक रिपोर्ट..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MP Amol kolhe On Shirur Constituency : महायुतीमध्ये नाशिकचा तिढा सुटत नाहीय, तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्याविरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, असा दावा अमोल कोल्हे यांनी केलाय. त्याला खुद्द भुजबळांनीच दुजोरा दिलाय. नाशिकमधून माझं नाव पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला.

शिरूरमधून लढता का? असे विचारलं होतं, असं भुजबळ म्हणालेत. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि भाजपाचे स्थानिक नेते सुद्धा या जागेवर दावा सांगतात. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीनं नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला नाही. समता परीषदेच्या पदाधिका-यांनीही बैठक घेऊन भुजबळांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे.

दरम्यान मला उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे असे नाही. सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत, असं भुजबळ म्हणतायेत. उमेदवारी उशिरा जाहीर करण्याचा महायुतीला फटका बसू शकतो. तसेच महातिढा सुटल्यावरही महायुतीच्या उमेदवारासाठी सगळे मित्र पक्ष एकदिलानं काम करणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT