Ghati Hospital Doctors Election Duty Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना 'इलेक्शन ड्युटी'; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

Ghati Hospital Doctors Election Duty: राज्यातील लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

Election Duty Maharashtra Lok Sabha Election

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रूग्णालयातील (Chhatrapati Sambhajinagar Ghati Hospital) डॉक्टरांनाही इलेक्शन ड्युटी लागली आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. आता डॉक्टर इलेक्शन ड्युटी करणार (Lok Sabha Election 2024) आहेत. (Latest Election Update)

रुग्णालयातील एकूण 92 जणांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. यामुळे घाटी रूग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता (Ghati Hospital Doctors Election Duty) आहे. त्यामुळे डॉक्टरांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. 4 आणि 5 एप्रिल रोजी निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येणार ( Election Duty) आहे. दरम्यान घाटीतील इलेक्शन ड्युटी लागलेल्या डॉक्टरांच्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली आहे.

अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांची इलेक्शन ड्युटी रद्द केली जाणार असल्याचं अधिष्ठातांनी सांगितलं आहे. जर डॉक्टर इलेक्शन ड्युटीवर असतील, तर रूग्णांची काळजी कोण (Maharashtra Lok Sabha Election) घेणार, त्यांचे उपचार कोण करणार असे विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचं दिसत आहे. घाटी रूग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेत. सध्या उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. 19 एप्रिल ते 1 जून या 44 दिवसांच्या काळात एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणूका (Lok Sabha 2024) पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कामाला लागला आहे. निवडणूक आयोगाने डॉक्टरांना निवडणूकीच्या कामाला जुंपण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT