Bachchu Kadu On Navneet Rana and Ravi Rana Saam Tv
लोकसभा २०२४

Amravati Lok Sabha: 'राजकारणात शून्य झालो तरी चालेल, शरणागती पत्करणार नाही', राणा दाम्पत्यांविरोधात बच्चू कडू आक्रमक

Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप यंदा खासदार नवनीत राणा यांना तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे. बच्चू कडू यांनी येथून प्रहार संघटनेचा उमेदवारही उभा करणार असल्याचं म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Amravati Lok Sabha:

''आम्ही अमरावतीची लोकसभा ही मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत. सगळ्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की, ज्या राणांनी आपल्याला इतकं अपमानित केलं. यातच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, राजकारणात आपण पुन्हा शून्य झालो तरी चालेल, मात्र इतकी शरणागती आपण पत्करायची नाही. काही असेल तर आघाडीला उमेदवारी मग, मर राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता आहे'', असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप यंदा खासदार नवनीत राणा यांना तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना बच्चू कडू असे म्हणाले आहेत. बच्चू कडू यांनी येथून प्रहार संघटनेचा उमेदवारही उभा करणार असल्याचं म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रवी राणा यांनी यापूर्वी बच्चू कडू यांच्यावर जे आरोप केले होते, त्या आरोपांमुळे कार्यकर्ते संतप्त आहेत. तसेच जिल्ह्यात आमचे दोन आमदार असूनही भारतीय जनता पक्ष आम्हाला विचारात देखील घेत नसल्याची नाराजी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना बोलून दाखवली आहे. (Latest Marathi News)

राणा यांच्याविरोधात संपूर्ण जिल्हाभर वातावरण आहे. त्याचाच आम्ही फायदा घेत असून आमचा प्रहारचा उमेदवार हा देखील भाजपचाच कार्यकर्ता आहे. एक लाख मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येईल, असे देखील बच्चू कडू यांनी सांगितलेले आहे.

वेळ पडल्यास आघाडीला उमेदवार मागा मात्र राणांना कुठल्या प्रकारे समर्थन द्यायचे नाही, असा कार्यकर्त्यांचा निर्धार झालाचे देखील बच्चू कडू यांनी सांगितले. निवडणुकीत असताना रंगबाजीने जर राणा बोलत असेल राजकारणातून पूर्ण शून्य झाला तरी चालेल, मात्र शरणागती पत्करायची नाही, असे कार्यकर्त्यांची मानसिकता असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT