Mumbai North-Central Election Live updates Saam TV
लोकसभा २०२४

Breaking News: ईशान्य मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

Mumbai North-Central Election Live updates : मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी घेऊन बसल्यामुळे कांजूर मार्ग पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. लिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांसाठी महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. यामध्ये मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच ईशान्य मुंबईतून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी घेऊन बसल्यामुळे कांजूर मार्ग पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस निघून गेले आहेत. या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांना नेमक्या कोणत्या कलमाखाली ताब्यात घेतलं, त्यांची चूक काय होती. ते मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर होते, असा जाब शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी १० मिनिटाच्या आत सोडून द्यावं, अन्यथा पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी दिला आहे.

सुनील राऊत म्हणाले, "सध्या पोलीस दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. निवडणूक कार्यालयात जाऊन ते नियम समजून घेणार आहेत. जर कार्यकर्ते निवडणूक केंद्राच्या १०० मीटरच्या बाहेर असेल, तर आम्ही त्यांना सोडून देऊ, असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे".

"पोलीस यंत्रणा भाजपच्या दबावाखाली आहे. ते भाजपचे गुलाम म्हणून काम करीत आहेत. पण मी पोलिसांना सांगतो, की ४ जून रोजी सरकार बदलणार आहेत. त्यावेळी तुम्ही काय करणार? आमच्या कार्यकर्त्यांना तत्काळ सोडून द्यावं, अन्यथा आंदोलन करू", असा इशाराही सुनील राऊत यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा हॉट लूक, फोटो पाहून उडेल तुमची झोप

Navpancham Rajyog 2025: 10 ऑगस्टपासून 'या' राशींचं नशीब पालटणार; मंगळ-यम बनवणार शक्तीशाली नवपंचम राजयोग

मंत्री महाजनांचा पुतण्या, शिंदेंनाही ओळखतो; नोकरीचे आमिष दाखवून मुलीला फसवलं, जामनेरच्या तरूणाला अटक

Maharashtra Live News Update: अंबरनाथचं न्यायालयच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अंबरनाथमध्ये दाखल

Gauri Ganpati : गौरी गणपतीत जुन्या साड्यांना द्या ट्रेंडी लूक

SCROLL FOR NEXT