Rahul Gandhi On Constitution  Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: भाजपचे नेते उघडपणे सांगतात की, ते सत्तेवर आल्यास संविधान बदलू: राहुल गांधी

Rahul Gandhi On Pm Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी तामिळनाडूमध्ये एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Satish Kengar

Rahul Gandhi On Constitution:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी तामिळनाडूमध्ये एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सत्तेत आल्यास भारताचे संविधान बदलेल, असे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना फक्त या देशाच्या अर्थ आणि संचार प्रणालीवर त्यांची मक्तेदारी असावी, याची काळजी आहे. ते म्हणाले आहेत की, भाजप नेते उघडपणे सांगतात की ते पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलू.

ते म्हणाले की, पूर्वी संपूर्ण जग भारताला लोकशाहीचा प्रकाश स्तंभ म्हणायचे. ते आज म्हणतात की भारतात आता लोकशाही राहिलेली नाही. राहुल म्हणाले की, भारतात विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एकीकडे न्याय, स्वातंत्र्य आणि समता याचं समर्थन करणाऱ्या पेरियार आणि इ.व्ही. रामासामी यांच्या विचारधारेचे लोक आहेत. दुसरीकडे आरआरएस, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार आहे.

राहुल गांधी पुढे आरोप करत म्हटलं की, पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष 'एक राष्ट्र, एक नेता आणि एक भाषा' या विचारसरणीसाठी उभा आहे. राहुल म्हणाले की, भारतात अनेक भाषा, संस्कृती आणि इतिहास आहे. आपल्यासाठी सर्व काही समान आणि महत्त्वाचे आहे. यावरूनच हा लढा सुरू आहे. तमिळ, बंगाली आणि देशातील इतर भाषांशिवाय भारत पूर्ण होऊ शकत नाही.

ते म्हणाले की, केंद्र सरकार ईडी, सीबीआय आणि आयटीचा राजकीय शस्त्रे म्हणून वापर करत आहे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान स्वतः करतात. काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT