Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra Politics Saam TV
लोकसभा २०२४

Breaking News: भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून CM शिंदे अन् अजित पवारांचं नाव वगळलं; समोर आलं मोठं कारण

Satish Daud

BJP Star Pracharak List

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, आता भाजपने स्टार प्रचारकांची सुधारित यादी जाहीर केली असून यामधून शिंदे आणि अजित पवार यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती आणि भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. स्टार प्रचारकांचे उल्लंघन केले आहे, असं यात म्हटले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय पक्षांना ४० स्टार प्रचारकांना उमेदवारी देण्याची परवानगी आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागांसाठी एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात १९ एप्रिलला मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यात मुंबई शहरी भागात २० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीने काही दिवसांपूर्वी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह ४० जणांच्या नावांचा समावेश होता. महायुतीतील दोन प्रमुख पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचही नाव या यादीत होतं. मात्र, भाजपने जारी केलेल्या स्टार प्रचारकांच्या नावांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला होता.

यासंदर्भात राष्ट्रवादीने भाजपविरोधात निवडणूक आयोगात तक्रार देखील दाखल केली होती. भाजपने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. दरम्यान, निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेण्याआधीच भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव या यादीतून हटवलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून भाजपच्या स्टार प्रचारकांची नवीन यादी दिली आहे. दरम्यान, ही यादी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उर्वरित लोकसभा मतदारसंघांसाठी वैध मानली जाऊ शकते, असं सिंह यांनी यादीत म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT