Beed News Saam TV
लोकसभा २०२४

Beed News: ....तर पोलीस संरक्षणात फिरण्याची वेळ का आली? बजरंग सोनवणेंचा पंकजा मुंडेंना थेट सवाल

Beed Latest News: विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी गेल्या 15 वर्षात विकास केला होता, तर मग आता त्यांना पोलीस संरक्षणात फिरण्याची वेळ का आली ? असा सवाल उपस्थित केला आहे.

विनोद जिरे

Beed Loksabha Constituency News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे यांना तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड (Beed) लोकसभेसाठी आता प्रचारात रंग भरू लागले असून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी देखील सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे अंबाजोगाईच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी गेल्या 15 वर्षात विकास केला होता, तर मग आता त्यांना पोलीस संरक्षणात फिरण्याची वेळ का आली ? असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण सुरू असून विशिष्ट समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, लाठीचार्ज केला जात आहे हे चुकीचे असल्याचे देखील बजरंग सोनवणे यावेळी म्हणाले. (Maharashtra Loksabha Election)

पंकजा मुंडे बीडमध्ये घर बांधणार...

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आता बीडमध्ये घर बांधणार असून वर्गणी गोळा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. "आता मी बीडमध्ये देखील घर बांधणार आहे. माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही जर सर्वांनी वर्गणी करून मला जागा घेऊन दिली, तर घर बांधते ते तुमच्याच नावावर राहू द्या, मी फक्त मरेपर्यंत राहते, असे म्हणत बीडमध्येही घर बांधणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT