Surabhi Jayashree Jagdish
महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांच्या सहकार्यांने पुढे जाण्याचे योग आहेत. जवळच्या लोकांकडून समाधानाच्या घटना घडतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा आज लाभणार आहे. तुमचं कार्यक्षेत्र सुद्धा वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये एकूणच प्रगती होईल.
गुरुकृपा आपल्यावर वरदहस्त ठेवेल. काहींचा धार्मिक कार्यामध्ये सहभाग राहील. लांबचे प्रवास होतील. लेखन कार्यामध्ये, ग्रंथ लेखनामध्ये विशेष प्रगती होईल. तीर्थयात्रेचे नियोजन होईल.
आपल्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची दाट शक्यता आहे. कोणाचेही सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवू नका. एकूणच वाहने जपून चालवावीत.
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळाल्यामुळे दिवस चांगला जाईल. व्यवसायात भरभराट होईल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे सुद्धा कल राहील. तब्येतीच्या तक्रारी असतील तर स्वतःची काळजी घ्यावी.
आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. वैचारिक परिवर्तन होईल. आपल्या मधील सृजनशीलता वाढेल.
कामानिमित्त प्रवास होण्याचा आजचा दिवस आहे. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. मातृसौख्य, वाहनसौख्य, गृहसौख्य या दृष्टीने दिवस चांगला आहे.
महत्त्वाची कामे धाडसाने पार पाडाल. कोणत्याही गोष्टीत मागे हटणार नाह. शेजारी, नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामाला नव्याने हुरूप येईल.
जुनी येणी काही अडकली असतील, अडकलेले पैसे असतील तर ते वसूल होतील. उत्तम धनालाभ होतील. कौटुंबिक स्वास्थ मिळेल.
आज तुम्ही ठरवलेली दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य मनोबल दोन्हीही उत्तम राहणार आहे.
काही ना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता सुद्धा असेल. खर्चाला धरबंद राहणार नाही.