Maharashtra Loksabha Election 2024: Saamtv
लोकसभा २०२४

Pune News: EVM मशिनवर 'कमळ' दिसेना.. पुणेकर आजोबा गोंधळले; भयंकर संतापले| VIDEO व्हायरल

Maharashtra Loksabha Election 2024: राज्यभरातील ११ लोकसभा मतदार संघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. सकाळपासूनच लोक मतदान केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. ७ मे २०२४

राज्यभरातील ११ लोकसभा मतदार संघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. सकाळपासूनच लोक मतदान केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. या निवडणुकीत आत्तापर्यंत विरोधात असलेले अनेक पक्ष एकत्र असल्याने उमेदवाराचे चिन्ह शोधताना मतदारांची दमछाक होत आहे. अशातच ईव्हीएम मशिनवर कमळ चिन्हचं नसल्याने मतदानासाठी आलेले आजोबा चांगलेच संतापल्याचा प्रकार पुण्यात घडला. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे राजकारणाचे चित्र पुर्णपणे बदलून गेले. पिढ्यानपिढ्या एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आता गळ्यात गळे घालून फिरताना दिसत आहेत. या राजकीय युत्यांमुळे जशी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गोची झाली तसाच मतदार राजाही गोंधळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असाच प्रकार पुण्यातील धायरीच्या मतदान केंद्रावर घडला.

पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर हे आजोबा मतदानासाठी आले होते. भाजपच्या पारंपारिक मतदार असलेल्या आजोबांना ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्याने ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. बारामतीत महायुतीचा उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर कमळ चिन्ह देण्यात आले नाही, यावरुनच या आजोबांनी संताप व्यक्त केला आणि थेट मतदान अधिकाऱ्यांशी वाद घातला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही सकाळीच आपला मदतानाचा हक्का बजावला. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीकडून सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT