Rohit Pawar News  Saam tv
लोकसभा २०२४

Rohit Pawar News: 'बच्चा बडा हो गया...' सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी दादांना डिवचले!

Baramati Loksabha Election Result Supriya Sule Vs Sunetra Pawar: पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आपला गड राखणार की अजित पवार धक्का देणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे.

Gangappa Pujari

बारामती. ता. ४ जून २०२४

देशभरातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल आज समोर येत आहेत. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल समोर आला आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झालेल्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत तिसऱ्यादा बारामतीच्या खासदार होण्याचा मान मिळवला आहे. या विजयानंतर रोहित पवार यांनी ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

"बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय," असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

तसेच "बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन," असेही त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले. संपूर्ण प्रचारात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळेच राज्यासह देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते. अखेर या लढतीचा अंतिम निकाल समोर आला असून सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT