rohit pawar-Ajit pAwar Saam TV
लोकसभा २०२४

Baramati Lok Sabha: आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, बारामतीत काय घडतंय?

Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.

Satish Daud

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत, याची चौकशी निवडणूक आयोग व गृह खात्याने करावी, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप केले, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. "बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस... यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय", अशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून केली आहे.

"यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा?" असा सवाल देखील आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

"वेल्हेतील जिल्हा मध्यवर्ती बँक ही रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू आहेत", असे म्हणत रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

"रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात रडीचा डाव सुरु केला. नेहमी कट, कारस्थान करणाऱ्या रोहित पवार याना तात्काळ अटक करून अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत, याची चौकशी निवडणूक आयोग व गृह खात्याने करावी", अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केली आहे.

अजित पवारांनी फेटाळले आरोप

दुसरीकडे रोहित पवार यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत. "मी ७ विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. पण, आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि यापुढेही करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना ४२००० कोटींचं गिफ्ट! दोन दिवसांत करणार मोठी घोषणा

Political News : मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधीच माजी मंत्र्याने पक्षाची साथ सोडली

Sachin Pilgaonkar: 'उर्दू ही हिंदूंचीच भाषा...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Maharashtra Live News Update: नागपूर मधील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी निलंबित

'कंटाळा आल्याने आईला संपवलं', लेकाकडून हादरवणारं कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT