Ashok Chavan on Nana Patole Saam Tv
लोकसभा २०२४

Ashok Chavan: नाना पटोलेंमुळे काँग्रेसने जागा गमावल्या, मविआच्या जागावाटपावरून अशोक चव्हाण यांची टीका

Ashok Chavan on Nana Patole: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर नाना पटोले काही बोलू शकता नाही. यामुळे सगळे मतदारसंघ सोडून देण्याचं काम यांनी केलं आहे: अशोक चव्हाण

साम टिव्ही ब्युरो

Ashok Chavan on Nana Patole:

''उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर नाना पटोले काही बोलू शकता नाही. यामुळे सगळे मतदारसंघ सोडून देण्याचं काम यांनी केलं आहे. आपण पाहतोय काँग्रेसची आता काय अवस्था झाली आहे. काँग्रेसचं इतकं दुर्दैवी चित्र देशात आणि महाराष्ट्रात कोणी पाहिलं नव्हतं'', असं भाजप खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे प्रचार सभा आहे. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत अशोक चव्हाण म्हणाले, मोदी देशाचा सूक्ष्म नियोजन करत आहे. अत्यंत बारकाईने ते प्रत्येक कामात लक्ष घालतात. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये त्यांनी जे काम केले ते वाखण्याजोगे आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''सर्व तीर्थक्षेत्राना पुनरुज्जीवन देण्याचा काम मोदींनी केले. त्यामुळे ज्यांना दूरदृष्टी असेल त्यांना विरोध करण्याचा कारण नाही. विरोधासाठी विरोध नको.'' (Latest Marathi News)

याचसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यसक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ''लोकांना घरकुल देण्याच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल. एका धनुष्यबाण आणि कमल चिन्हाळ मत दिल्यानं मोठं काम झालं. किसान सन्मान योजनेत 2 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाले, 5 लाख 91 हजार लोकांना आरोग्य विमा मिळाला.''

दरम्यान, दोन दिवस आधीच महाविकास आघाडीने आपलं जागावाटप जाहीर केलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गट 21 जागा, काँग्रेस 17 जागा आणि शरद पवार गट 10 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. ठाकरे गटापेक्षा काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने पक्षातील अनेक नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यामध्येच काँग्रेस नेत्या वर्ष गायकवाड यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT