Amritpal Singh
Amritpal Singh Saam Digital
लोकसभा २०२४

Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभेच्या रिंगणात; दिब्रुगडच्या तुरुंगातून केली उमेदवारीची घोषणा

Sandeep Gawade

पंजाबमधील अजनाळा पोलीस ठाण्यावरी हल्ल्यानंतर खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग देशभर चर्चा झाली होती. सध्या लोकसभा निवडणुकाची धामधुम सुरू असून अमृतपाल सिंग संदर्भात एक मोठी बातमी आहे. अमृतपाल सिंग खडूर साहिबमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सध्या तो आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहे. अमृतपाल यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत पत्रकार परिषदही घेतली.

अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग उर्फ ​​तुफान याच्या सुटकेसाठी अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांची पोलिसांशी हिंसक झटापट झाली होती. शेकडो लोकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता.अमृतपालचं म्हणणं होतं की त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. त्याने लवप्रीतला सोडण्याची आणि तिच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची धमकी दिली होती. मात्र, नंतर पोलिसांनी लवप्रीतला सोडून दिले.

याच प्रकरणात अमृतपालचे काका हरजीत सिंग यांचंही नाव होतं. त्यांनी शरणागती पत्करली होती. हरजीतसोबतच अमृतपाल आणि त्याच्या काही साथीदारांवरही एनएसए दाखल करण्यात आले होते. खलिस्तान समर्थक अमृतपाल यांनी अनेकवेळा उघडपणे, खलिस्तानविषयी भूमिका बोलून दाखवली होती.

एवढेच नाही तर भारतीय राज्यघटनेवर त्यांचा विश्वास नाही. तो शिख समुदायासाठी स्वतंत्र राज्यघटना बनवण्याचा सल्ला देत असतो. खलिस्तानची कल्पना चुकीचं नसल्याचं त्याचं मत आहे. आम्ही अन्याय, अत्याचार संपवण्याची मागणी करत आहोत. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. माझ्याविरुद्ध खोटी एफआयआर दाखल केल्यामुळे अजनाळ्यात हिंसाचार झाला, असं त्याचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT