Amol Kolhe
Amol Kolhe Saam Tv
लोकसभा २०२४

Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आधी आक्षेप, नंतर अर्ज ठरला वैध; नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

Shirur Lok Sabha Constituency:

>> रोहितदास गडदे

शिरूर लोकसभेत आज विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. अपक्ष उमेदवार आफताब शेख यांनी धर्मेंद्र परदेशी यांच्या मार्फत तशी तक्रार केली होती. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यांची पडताळणी केली. अमोल कोल्हे यांनी स्वतः देखील त्यांच्या वकीलांशी याबाबत बरीच चर्चा केली. अखेर चौकशीअंती अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

पुण्यातील विश्राम बाग पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल आहे, असं असताना त्याचा उल्लेख नामनिर्देशन पत्रात कोल्हेनी केला नाही, असा आरोप करत, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या आक्षेपात तथ्य आढळलं नाही, त्यानंतर निवडणूक आयोगाने कोल्हे यांचा अर्ज वैध ठरवला आहे.

यावरच आता आपली प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले की, विरोधकांच्या छातीत धडकी भरली म्हणून रडीचे डाव खेळायला सुरवात झाली आहे. हे करुन ही उपयोग नाही, म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना. सामना दिलेरीने खेळायचा असत, असं म्हणत त्यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावपाटलांवर टीका केली आहे.

ते म्हणाले की, एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार. २०१६ ला असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला विरोध केला होता, म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होता. कारण हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडू नये, यासाठी या सभेला विरोध केला होता. धार्मिक तेढ वाढू नये, यासाठी हा विरोध केला होता आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता.

कोल्हे म्हणाले, पण यासंदर्भात मला कोणतेही कल्पना नव्हती, मला पोलिसांकडून कोणतीही नोटीस आलेली नव्हती. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती. व्यापक देश हिताच्या भावनेने ज्या सभेला विरोध केला होता, कारवाईच्या भीतीने भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, ते असले रडीचे डाव खेळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

SCROLL FOR NEXT