Nashik Lok Sabha: नाशिकसाठी भुजबळांची मोठी खेळी? दिलीप खैरेंनी घेतला उमेदवारी अर्ज; शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार?

Chhagan Bhujbal News: नाशिकच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
Chhagan Bhujbal And Eknath Shinde
Chhagan Bhujbal And Eknath ShindeSaam Tv

Nashik Lok Sabha 2024:

नाशिकच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी लोकसभेचा अर्ज घेतला आहे. यानंतर छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रावण झाले आहेत.

छगन भुजबळ यांनी जरी आपण माघार घेत असल्याचं सांगितलं असलं तरी अजित पवार गटाने या जागेवरच आपला दावा सोडलेला नाही. याचबद्दल बोलताना दिलीप खैरे म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती आणि ज्या घडामोड घडत आहेत, या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज मी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Chhagan Bhujbal And Eknath Shinde
Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil: कोण डमी अन् कोण डॅडी?, शिरूर लोकसभेत कोल्हे-आढळरावांमध्ये फटकेबाजी

ते म्हणाले की, ''छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार आहे. आज पहिला दिवस होता, अर्ज घ्यावासा म्हणून वाटलं, म्हणून मी अर्ज घेतला.'' साम टीव्हीशी बोलताना खैरे यांनी ही माहिती दिली आहे.

खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर यावर आपली प्रतिकिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि नेते संजय शिरसाट म्हणाले की, ''खैरे किंवा इतर कोणीही अर्ज घेणे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र मी १०० टक्के सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे. ही जागा शिवसेनाच लढवणार, याच्या उमेदवाराची घोषणा आज सायंकाळी किंवा उद्या दुपारी केली जाईल.''

Chhagan Bhujbal And Eknath Shinde
Uddhav Thackeray: लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे कुणाला मतदान करणार? भर पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं...,

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. महायुतीकडून उमेदवारी निश्चित नसताना त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. हेमंत गोडसेच्या सहकाऱ्यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. यातच आता महायुतीकडून ही जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com