Congress News Saam TV
लोकसभा २०२४

India Alliance: 'उद्या रात्रीपर्यंत दिल्लीतच थांबा', लोकसभा निकालाआधी काँग्रेसचे मित्रपक्षांना आवाहन; काय आहे कारण?

Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी काँग्रेसने इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांना दिल्लीत राहण्याचे आवाहन केलं आहे.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीआधी काँग्रेसने इंडिया आघाडीच्या सर्व मित्रपक्षांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या वतीने इंडिया आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना उद्या रात्री किंवा परवापर्यंत दिल्लीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. निवडणूक निकालानंतर ही बैठक होणार आहे. अपेक्षेनुसार आणि अंदाजानुसार जागांची संख्या आली नाही, तर पत्रकार परिषद / राष्ट्रपतींची भेट यासह अन्य पर्यायांवर चर्चा केली जाईल, जिथे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

यातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात बहुमत मिळाल्याच्या 24 तासांच्या आत इंडिया आघाडी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आमच्याकडे पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत, पण भाजपचे काय? इंडिया आघाडी निकाल जाहीर झाल्यापासून 24 तासांच्या आत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल."

याआधी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार म्हणाले आहेत की, 'आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. आम्हाला Laapataa Gentleman म्हटले जायचे, पण याच काळात देशात मतदानाचा विश्वविक्रम झाला. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे.' लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. राजीव कुमार म्हणाले की, 'आम्ही फेक न्यूज थांबवल्या, पण स्वत:वर होणारे हल्ले थांबवू शकलो नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT