Ajit Pawar On Sharad Pawar Yandex
लोकसभा २०२४

Ajit Pawar On Sharad Pawar: एकेकाळी शरद पवारांना दैवत मानत होतो; अजित पवार नेमकं काय बोलले?

Ajit Pawar On Maharashtra Din: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं आहे.

Rohini Gudaghe

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांबद्दल एक वक्तव्य केलं. तसंच त्यांनी राज्यातील जनतेला उष्णतेपासून बचाव करावा, काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

यावेळी शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार एक वरिष्ठ नेते आहेत. मी एक वेगळा रस्ता निवडला आहे. मी एकेकाळी त्यांना दैवत म्हणून मानत (Ajit Pawar On Sharad Pawar) होतो. त्यांच्या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलावं, एवढा मोठा मी नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिलेल्यांना अभिवादन केलं. अधिवेशनाच्या वेळी राज्यपालांच्या भाषणात बेळगाव प्रश्न मांडला जातो. सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू (Ajit Pawar On Maharashtra Din) आहे. आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाही. बेळगाव भागातील मराठी भाषकांना ज्या ज्या सवलती देता येतील, त्या सरकारकडून दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींच्या 'भटकता आत्मा' या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी कोणाला उद्देशून म्हटले ते मला माहिती नाही. मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. तेव्हा मी भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे? असं मी विचारेल. राज्यात अधिकाधिक जागा (Ajit Pawar News) निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंना सवाल

उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण देऊन दाखवावं महाराष्ट्रात कुठे लूट झाली. त्यांनी आणि मी सरकार अडीच वर्षे एकत्र चालवलं आहे. आमच्यात कधीही मतभेद नव्हते. निवडणुकीच्या काळात असे आरोप (Politics News) होतात. निवडणुकीचं स्टेटमेंट गांभीर्याने घ्यायचं नसतं, असं विलासराव यापूर्वी म्हटले होते असंही उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT