Ajit Pawar vs Amol Kolhe Shirur Lok Sabha 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Shirur Lok Sabha: अजित पवारांनी डाव टाकला, अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी मोठी खेळी; शिरुरचे समीकरण बदलणार?

Shirur Politics News: शिरुर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार मोठा डाव टाकला आहे.

Satish Daud

Shirur Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी महायुतीकडून वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार मोठा डाव टाकला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणार हे आता निश्चित झालं आहे. पण ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही निवडणूक लढवणार आहेत. मी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून पराभवाचा बदला घेण्यासाठी शिरुरमधून लढवणार, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (Breaking Marathi News)

शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत बरीच शोधाशोध झाली. मध्यंतरी नाना पाटेकर यांच्या नावाची देखील चर्चा झाली. मात्र, अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवणार यावर एकमत झालं. आज, शनिवारी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.

त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात थेट सामना रंगणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघ हा २००८ मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर २००९ आणि २०१४ साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेनं आपला भगवा फडकवला.

२००९ मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुरमध्ये ४ लाख ८२ हजार ५६३ मतं मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट होती. शिवसेनेने यावेळी पुन्हा शिवसेनेनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिलं. मिळालेल्या संधीचं सोनं करत त्यांनी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

एकेकाळी शिरुर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी डाव टाकत अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. अमोल कोल्हे त्यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे अत्यंत लोकप्रिय झाले होते.

शरद पवार यांनी याच लोकप्रियतेवरुन अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभेची उमेदवारी दिली. कोल्हेंनी शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवत आढळराव पाटील यांचा तब्बल ५८,४८३ मतांनी पराभव केला. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात आढळराव पाटील यांना उमेदवारी देऊन नवी खेळी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

SCROLL FOR NEXT