गणेश कवाडे, मुंबई|ता. ९ मे २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारसभेत १९९३ च्या बाँम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सहभागी झाल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्त केशव उपाध्ये यांनी केला आहे. उपाध्ये यांच्या या दाव्यानंतर नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारामध्ये ११९३ चा बाँम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला। आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
"हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ९३ च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? उद्धव ठाकरे तुमची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?" असा खोचक सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.