Face Tells About Your Health saam tv
लाईफस्टाईल

Face Tells About Your Health: तुमचा चेहरा सांगतो तुम्ही आहात आजारी; हे ३ बदल दिसून आल्यास वेळीच व्हा सावधान

How Face Tells About Your Health: आजारी असल्यावर डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेकदा डॉक्टर आपला चेहरा पाहून आजाराचा अंदाज लावतात. मात्र आपला चेहरा नेमकं काय सांगतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

असं म्हणतात की, आपण आजारी असलो तर आपला चेहराच सांगतो. मुळात चेहऱ्यावरून अनेक गोष्टी समजून येऊ शकतात. डॉक्टरांकडे गेल्यावरही तुम्ही पाहिलं असेल डॉक्टर अनेकदा चेहरा पाहून तुम्हाला काय झालं असेल याचा अंदाज लावतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, आपण आजारी आहोत हे चेहरा आपल्याला कसं सांगतं?

चेहरा कसा सांगतो तुमच्या आरोग्याची माहिती?

डॉक्टर अनेकदा तुमचा चेहरा पाहून तुमच्या आजाराचं निदान करतात. तुमचा चेहरा हा बहुतेकदा पहिला भाग असतो जिथे अंतर्गत समस्या दिसून येतात. आहारतज्ज्ञ न्मामी अग्रवाल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, आळस ते चेहऱ्यावर येणाऱ्या पुरळांबदद्ल प्रत्येक छोटा बदल आरोग्याबाबत एक संकेत असू शकतो. हे संकेत नेमके काय असतात पाहूयात.

डोळ्यांखाली काळसरपणा (Dark circles)

ताणतणाव किंवा कमी झोप याला कारणीभूत असते. परंतु जर हे डार्क सर्कल कायम राहिले तर ते आयर्नच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आयर्न तुमच्या रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करतं आणि जेव्हा तुमच्या शरीरात त्याची कमतरता असतं तेव्हा तुम्हाला थकवा जाणवू शकतो. परिणामी तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येऊ शकतात.

जॉ लाईनवर पुरळ (Jawline acne)

अनेकदा जॉ लाईनवर पुरळ हार्मोनल असंतुलनाशी संबंधित असू शकतात. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. पीसीओएस सारख्या परिस्थितीत या प्रकारचे पुरळ सामान्य मानले जातात. अनियमित मासिक पाळी किंवा चेहऱ्यावरील केसांची वाढ देखील होते.

जॉ लाईनवर पुरळ (Jawline acne)

अनेकदा जॉ लाईनवर पुरळ हार्मोनल असंतुलनाशी संबंधित असू शकतात. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. पीसीओएस सारख्या परिस्थितीत या प्रकारचे पुरळ सामान्य मानले जातात. अनियमित मासिक पाळी किंवा चेहऱ्यावरील केसांची वाढ देखील होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT