make eyes look bigger google
लाईफस्टाईल

Eye Makeup Tips: डोळे मोठे दिसत नाहीत? या ४ सोप्या टिप्स करा फॉलो, बारिक डोळे दिसतील टपोरे अन् रेखीव

Makeup Hacks: योग्य आय केअर, आयब्रो शेप आणि मेकअप ट्रिक्स वापरल्यास लहान डोळेही मोठे, टपोरे आणि सुंदर दिसू शकतात, असा सल्ला ब्युटी एक्स्पर्ट देतात.

Sakshi Sunil Jadhav

ज्या महिलांचे डोळे सुंदर अन् टपोरे असतात त्या नेहमीच चारचौघात उठून दिसतात. त्यांच्यावर कोणत्याही स्टाईलचा मेकअप मॅच होतो. काही महिलांचे डोळे लहान असतात. त्यामुळे त्यांना मेकअपच्या मदतीने डोळ्यांना सुंदर लूक द्यावा लागतो. जर त्यामध्ये काही गल्लत झाली की, संपूर्ण लूक खराब होतो. पण आता टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही ब्युटी एक्स्पर्टने दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने सुंदर लूक अन् सुंदर टपोरे डोळे मिळवू शकता.

१. डोळ्यांभोवतीच्या त्वचेची काळजी घ्या

डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते. सूज, काळी वर्तुळं किंवा ड्रायनेस असेल तर डोळे लहान दिसतात. त्यासाठी तुम्ही डोळ्यांखाली थंड चमचा किंवा कूल कॉम्प्रेस ठेवा, त्याने सूज कमी होते. हायलुरॉनिक अ‍ॅसिड, पेप्टाइड्स असलेल्या आय क्रीम तुम्ही मेकअप आधी किंवा रात्री झोपण्याआधी वापरु शकता.

२. भुवयांचा आकार तपासा

प्रत्येक महिलेला तीच्या आयब्रोचा आकार कसा हवा? हे कळतं. तो सणावाराला मेंटेन ठेवा. यासाठी तुम्हाला आयब्रो करावे लागतील. आयब्रोचा आकार डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. नीट आकार दिलेल्या भुवयांनी डोळे उघडे आणि फ्रेश दिसतात. पण कधीही खूप बारीक आयब्रो ठेवू नका. याने तुमच्या डोळ्यांचे तेज जात.

३. मेकअपचा योग्य वापर करा

मेकअपमुळे डोळे मोठे दिसतात. त्यात तुम्ही पापण्यांना कर्ल करू शकता. त्यासाठी मस्कारा लावण्याआधी पापण्यांना कर्लरने नीट वळवा. पापण्यांच्या मुळापासून टोकापर्यंत कर्ल करा. त्याने डोळे जास्त मोठे दिसतात. कर्लर 2 ते 3 सेकंद गरम केल्यास हेअर टॉंगसारखा याने उत्तम रिजल्ट मिळतो.

४. आयलाइनर नीट लावा

वरच्या पापण्यांच्या कडेवर पातळ आयलाइनर लावा. टाइट लाइनिंग वरच्या वॉटरलाइनवर लाइनर करा. त्याने पापण्या दाट दिसतात. तर खालच्या पापण्यांवर जाड लाइनर लावू नका, त्याने डोळे लहान दिसतील. तुम्ही आधी लेंथनिंग मस्कारा, नंतर व्हॉल्युमायझिंग मस्कारा सुद्धा वापरू शकता. त्यात मधल्या आणि बाहेरच्या दिशेच्या पापण्यांवर जास्त मस्कारा लावा. तसेच सुंदर दिसण्यासाठी पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

अमेरिकेचा हेकेखोरपणा, जगात युद्ध भडकणार? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती काय? VIDEO

SCROLL FOR NEXT