अनेकांना असा समज आहे की, ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तर हृदयही पूर्णपणे निरोगी असतं. पण हा समज नेहमीच खरा ठरतो असं नाही. रक्तदाब हा हृदयाच्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग असला, तरी तो तुमच्या आरोग्याबाबत सर्वकाही सांगू शकत नाही. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत की नाही हे केवळ ब्लड प्रेशरवरून समजू शकत नाही.
द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना ठाण्यातील KIMS रुग्णालयाचे कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. सौम्य सेखर जेनासामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली.
डॉ. जेनासामंत यांनी सांगितलंय की, रक्तदाब सामान्य असणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा नाही याची खात्री मिळत नाही. अनेक रुग्णांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज असतानाही ब्लड प्रेशर पूर्णपणे नॉर्मल असतं.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू कोलेस्ट्रॉल, चरबी आणि कॅल्शियम यांचे थर साचू लागतात. यालाच प्लॅक म्हणतात. कालांतराने हे थर वाढत जातात आणि रक्तवाहिनी अरुंद होऊ लागते. सुरुवातीच्या काळात याची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे फक्त ब्लड प्रेशरवर विश्वास ठेवणं योग्य नाही.
हृदयातील ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे अनेकदा अगदी किरकोळ वाटतात. त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
चालताना, जिने चढताना किंवा शारीरिक काम करताना छातीत जडपणा किंवा दडपण जाणवणं
नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं
जबडा, मान किंवा डाव्या हातात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं
मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये तर कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे अचानक हार्ट अटॅक येण्यापूर्वी त्यांना काहीच कल्पना नसते. शरीरात काही नवीन त्रास जाणवत असेल तो काही वेळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
हृदयातील ब्लॉकेज शोधण्यासाठी एकच तपासणी पुरेशी नसते. रुग्णाची लक्षणं आणि जोखीम पाहून डॉक्टर योग्य तपासणी सुचवतात.
ही प्राथमिक तपासणी असून हृदयावर ताण आला आहे का किंवा पूर्वी काही समस्या झाली होती का याची माहिती मिळू शकते.
व्यायाम किंवा चालताना हृदय कसं काम करतं हे या चाचणीत तपासलं जातं. व्यायामादरम्यान हृदयात काही बदल होत आहेत का हे यात समजू शकतं.
या तपासणीत हृदयाची कार्यक्षमता, स्नायूंची हालचाल आणि पंपिंग व्यवस्थित होतंय का, हे पाहिलं जातं.
ही शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी आधुनिक स्कॅन तपासणी आहे. यात हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का, हे स्पष्टपणे दिसतं.
लक्षणं दिसण्यापूर्वीच रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक तयार होण्यास सुरुवात झाली आहे का याचा अंदाज या तपासणीतून येतो.
हृदयातील ब्लॉकेज निश्चित करण्यासाठी ही सर्वात योग्य तपासणी मानली जाते. यामध्ये विशेष कॉन्ट्रास्ट डाई रक्तवाहिनीत सोडलं जातं आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी अडथळा आहे किंवा रक्तवाहिनी किती अरुंद झाली आहे हे अचूकपणे समजतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.