आपण अनेकदा फ्रीजमध्ये बरेच पदार्थ ठेवत असतो. दररोज फ्रीजमध्ये पदार्थ ठेवणे ही प्रत्येक महिलेची रोजची सवय झाली आहे. पण काही पदार्थ फ्रीजमध्ये ठराविक वेळेपर्यंत ठेवणे मर्यादित असतात. तसेच जास्त वेळ पदार्थ ठेवल्याने आपल्या आरोग्याला ही हानी पोहचू शकते. याबरोबर फ्रीजमधील जास्त दिवसाचे पदार्थ खाल्याने आपण आजारी पडू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का,काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने आपल्या जीवाला हानी पोहचू शकते आणि आपण आजारी पडू शकतो. फ्रीजमध्ये तापमान थंड असते. यामुळे त्या थंड तापमानात भाजी ठेवल्याने त्यातील पोषक घटक सर्व नष्ट होतात. याबरोबर भाज्यांच्या चवीवर देखील परिणाम होतो. म्हणून तुम्हाला आज कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नये, याबद्दल सांगणार आहोत.
टोमॅटो
फ्रीजमधील थंडपणात टोमॅटो ठेवल्याने त्यांचा नैसर्गिक गोडवा कमी होतो. याबरोबर टोमॅटोची चव देखील कमी होते. म्हणून नागरिकांनी टोमॅटो फ्रीजच्या आतमध्ये ठेवू नये. त्यांनी टोमॅटो घरातील रुम मध्ये ठेवावे. यामुळे टोमॅटोची चव सुद्धा जाणार नाही.
काकडी
काकडी फ्रीजमध्ये ठेवल्याने मऊ होते. याबरोबर काकडी फ्रीजच्या थंड तापमानात ठेवल्याने त्यांची चव खराब होते. यामुळे आपल्याला काकडी खाताना कडू लागते. म्हणून काकडी नेहमी बाहेर ठेवा. काकडी बाहेर ठेवणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे काकडी जास्त खराब देखील होणार नाही.
वांगी
वांगी आपल्या शरीरासाठी फार गुणकारी असतात. पण वांगी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव आणि रंग दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. याबरोबर वांगी थंड तापमानात ठेवल्याने त्यांचा ताजेपणा जातो. म्हणून वांगी एका नॅार्मल बास्केटमध्ये ठेवा. जेणेकरुन ते लवकर खराब होणार नाही आणि दीर्घकाळ चांगली राहतील.
कांदे
फ्रीजमध्ये चिरलेले कांदे ठेवल्याने त्यांच्यामध्ये ओलावा निर्माण होतो. कांद्यामध्ये ओलावा निर्माण झाल्याने ते कडसर लागतात. यामुळे काद्यांची चव देखील बिघडते. याबरोबर फ्रीजमधील कांद्याचा वास इतर पदार्थांमध्ये पसरतो. म्हणून प्रत्येक व्यक्तींनी कांदा नेहमी हवेशीर आणि कोरड्या जागी ठेवावा. यामुळे कांदा बराचकाळ टिकून राहू शकतो.
प्रत्येक महिलेला असे वाटत असते फ्रीजमध्ये सर्व पदार्थ ठेवल्याने ते बराच काळ चांगले राहतात. परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. फ्रीजमध्ये कोणतेही पदार्थ किंवा भाजी जास्त वेळ ठेवू नये. याबरोबर काही भाज्यांना थंड तापमानाची आवश्यकता नसते. म्हणून फ्रीजमध्ये काही ठराविक भाज्या ठेवणे गरजेचे आहे.