Exercise For Fertility Saam Tv
लाईफस्टाईल

Exercise For Fertility : स्त्रियांमधील प्रजनन क्षमता वाढवायची आहे ? तर 'हा' व्यायाम करा

रोज व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच प्रजनन क्षमता सुधारते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Exercise For Fertility : आरामदायी जीवन जगणाऱ्या महिलांना लठ्ठपणाची समस्या तर असतेच शिवाय गरोदरपणात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरातील चरबी वाढणे हे इन्सुलिनच्या प्रतिकाराचे कारण आहे, ज्यामुळे हार्मोन्सला त्रास होऊ शकतो. यामुळे गर्भपात, अकाली प्रसूती आणि स्त्रीबिजांचा बिघाड होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही कुटुंब नियोजनाचा विचार करत असाल तर आधी स्वतःला फिट करा. ज्यामध्ये व्यायामासोबत आहाराचाही मोठा वाटा आहे. रोज व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच प्रजनन क्षमता सुधारते. तर आज आपण अशाच काही व्यायामांबद्दल (Exersice) जाणून घेणार आहोत, जे महिलांसाठी (Women) खूप फायदेशीर ठरू शकतात.

पिलेट्स आणि योग -

कोर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी हा खूप चांगला व्यायाम आहे. योगा आणि पिलेट्स या दोन्हींमुळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि पोट, कंबर आणि इतर अवयवांवर जमा होणारी चरबीही कमी होते. तसेच योगाद्वारे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

कार्डिओ -

हृदय गती वाढवणारे कार्डिओ वर्कआउट्स, जसे की धावणे, जॉगिंग आणि चालणे, हे सर्व शरीरात योग्य रक्त परिसंचरण करण्यास देखील मदत करतात जे पुनरुत्पादक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार दिवस कार्डिओ वर्कआउट करा.

स्ट्रेंथ ट्रेनिंग -

वजन कमी करण्याचा आणि वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. याशिवाय स्नायू बनवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे शरीराचा स्टॅमिना आणि ताकद वाढते. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे इन्सुलिनचा प्रतिकार कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची हार्मोनची पातळी वाढते. फक्त हे प्रशिक्षण योग्य पद्धतीने करा.

स्ट्रेचिंग -

कोणत्याही वर्कआउटच्या आधी आणि नंतर स्ट्रेचिंग महत्वाचे आहे कारण यामुळे दुखापत होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजनही मिळतो. ज्यामुळे स्नायूंचा वेदना आणि कडकपणा दूर होतो. प्रजनन क्षमता वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT