Heart Attack saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: औषधांशिवायही टाळू शकता हार्ट अटॅकचा धोका; 4 सोप्या टीप्सचा करा वापर

Heart attack prevention tips: जगात अनेकांना हार्ट अटॅकचा धोका असतो. परंतु तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या जीवनशैलीतील बदल करून औषधांशिवायही हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण देशभरात हृदयाच्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही जास्त आहे. चुकीचा आहार, जीवनशैली, जंक फूडचं सेवन, ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे या धोक्यामध्ये अजूनच वाढ होते. मात्र तुमच्या रोजच्या या सवयींमुळे तुमचं आरोग्य धोक्यात येतंय याची कल्पना तुम्हाला आहे का?

हृदयाच्या समस्या किंवा हार्ट अटॅक भारतीयांसाठी एक गंभीर आव्हान बनत चाललंय. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आरोग्यावरही होताना दिसतो. २०२३ मध्ये The Lancet पब्लिश झालेल्या अभ्यासानुसार, भारतात हार्ट अटॅक हे मृत्यूचं एक प्रमुख कारण ठरतंय. २०१७ मधील डेटानुसार, एकूण मृत्यूंपैकी हार्ट अटॅकने झालेल्या मृत्यूचं प्रमाण 26.6% होतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, अपुरी झोप, शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका अजून वाढतो. मात्र योग्य जीवनशैली, व्यायाम, ताणतणावाचं मॅनेजमेंट आणि झोप घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका आपण औषधांशिवाय कमी करू शकतो.

औषधांशिवाय कसा कमी करू शकता हार्ट अटॅकचा धोका?

दररोज व्यायाम करा

वजन उचलणं, स्नायूंचा व्यायाम करणं, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.

ओमेगा ३

अक्रोड, चिया सिड्स तसंच मासे यांचा तुमच्या आहारात समावेश करा. हे पदार्थ तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं फॅट्स काढून टाकण्यात हे पदार्थ मदत करतात.

पुरेशी झोप घ्या

झोपेच्या वेळा पाळणं आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. रात्री एकाच वेळी झोपण्यास जाणं आणि सकाळी त्याच वेळी उठणं तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. यामुळे तुमचा स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि तुमच्या रक्तवाहिन्यांना मजबूत करतात.

ताण कमी करा

डीप ब्रेथिंग, मेडिटेशन, पायी चालणं यामुळे तुमची नर्व्ह सिस्टीमवर ताण येत नाही. शिवाय तुमच्या हृदयाच्या वाहिनीवर दाब येत नाही.

हार्ट अटॅकची लक्षणं काय दिसतात?

  • छातीत वेदना होणं. यावेदना छातीपासून हातापर्यंत जाणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • थंड घाम येणं

  • उलटी होणं

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

आचारसंहिता लागली! ३१ डिसेंबरची पार्टी करण्यापूर्वी नक्की वाचा, अन्यथा मद्यपींना होणार अटक, वाचा नियम काय सांगतो

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Liver Damage: काय सांगता खरं की काय! त्वचेवर काळे डाग आणि लिव्हरचा काही संबंध आहे का? 5 गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात

Peru Benefits: हिवाळ्यात पेरू का खातात, त्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT