Worst Foods For Breastfeeding Saam TV
लाईफस्टाईल

Worst Foods For Breastfeeding : स्तनपानाच्या काळात महिलांनी 'हे' पदार्थ खाऊ नयेत; बाळाची तब्येत बिघडण्याची भीती असते

Ruchika Jadhav

प्रत्येक आईसाठी या जगात सर्वात श्रीमंत, मौल्यवान आणि किंमती तिचं स्वत:चं बाळ असतं. आपल्या बाळासाठी एक आई कोणत्याही अडचणी सहन करू शकते. अशात बाळ जेव्हा स स्तनपान करतं तेव्हा आईला खाण्यापिण्याची काही पथ्ये पाळावी लागतात. मात्र अनेक महिलांना याबाबात माहिती नाही. चुकूनही नको तो पदार्थ खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो.

त्यामुळे बाळाच्या आरोग्यासह बुद्धीवर आणि मानसिकतेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. स्तनपान करताना आईला स्वत:ला आणि बाळासाठी देखील व्हिटॅमीन, कॅलरीज आणि खनिजे जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांची जास्त गरज असते. बाळाच्या वाढीसाठी तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

कॅफेन टाळा

अनेक महिला अगदी गृहिणी असल्यातरी कामाचा व्याप काही कमी नसतो. त्यात बाळ झाल्यावर कामं आधीपेक्षा जास्त वाढतात. काम वाढल्याने ते पूर्ण करण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी महिला चहा, कॉफी या पदार्थांचे सेवन करतात. मात्र यामध्ये जास्तप्रमाणात कॅफेन असते. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कॅफेन घातक आहे. याने आईच्या दुधातील आयर्नचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे क्वचित कधीतरी चहा किंवा कॉफी घ्यावी.

पोटात गॅस करणारे पदार्थ

ब्रोकोली, कोबी, कांदा, राजमा, छोले अशा पदार्थांमुळे पोटात गॅस होतो. स्तनपान करणाऱ्या महिलेच्या शरीरात गॅस नसला पाहिजे. त्यामुळे याचा थेट परिणाम तुमच्या बाळावर होतो. त्यामुळे काळे चणे, शेंगदाणे, बटाटा, काकडी असे पदार्थ खाणे टाळा.

तिखट जेवण

काही महिलांना झणझणीत तिखट जेवण आवडतं. मात्र तो तिखटपणा दुधात सुद्धा उतरतो. त्यामुळे मसाले, मिरची, लसुण, कांदा असे मसाल्याचे पदार्थ आहारातून कमी करा.

आंबट फळ

लहान मुलं फार नाजूक असतात. त्यांना फार लवकर सर्दी, खोकला अशा समस्या जाणवतात. या समस्या तुमच्या बाळाला सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आंबट फळे आणि केळी खाणे टाळा. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्यामुळे बाळाला सुद्धा सर्दी, खोकला होऊ शकतो.

धूम्रपान

काही महिलांना धूम्रपान करण्याचं व्यसन असतं. हे व्यसन फार वाईट आहे. त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होईलच, शिवाय धूम्रपान करताना बाळाला स्तनपान केल्याने चिमुकल्या जीवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT