Late Pregnancy Effect On Relationship
Pregnancy TipsSaam tv

Pregnancy Tips : बाळ होण्यास उशिर झाल्यास नात्यात दूरावा वाढण्याची शक्यता; बेबी प्लानिंग आधी 'या' गोष्टी नक्की डिस्कस करा

Late Pregnancy Effect On Relationship : काही कपल आपल्या आयुष्यात आधी सेटल होण्याचा विचार करतात. त्यामुळे बाळ उशिरा होतं. मात्र याचा पूर्ण परिणाम महिलेच्या मनावर आणि शरिरावर होतो.
Published on

प्रत्येक पती-पत्नीच्या नात्यात त्यांना एकदा तरी आई-बाबा व्हावं असं वाटतं. मात्र बेबी प्लानिंग करताना दोघांची संमत्ती असणे गरजेची असते. काही कपल आपल्या आयुष्यात आधी सेटल होण्याचा विचार करतात. त्यामुळे बाळ उशिरा होतं. मात्र याचा पूर्ण परिणाम महिलेच्या मनावर आणि शरिरावर होतो. त्यामुळे आज या बातमीतून याच विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.

नात्यात दूरावा

पती-पत्नी दोघांनाही सेटल व्हायचं असतं. त्यामुळे सुरुवातीला पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. पत्नीच्या नोकरीला पती देखील संमत्ती देतो. मात्र नंतर ३० वय उलटल्यावर महिलेच्या शरिरात विविध बदल होतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यात अडचणी येतात. अशावेळी काही पती यासाठी पत्नीलाच जबाबदार ठरवतात.

एकत्र या गोष्टींची चर्चा करणे गरजेचे

जेव्हा तुम्ही बेबी प्लान करता तेव्हा दोघांनी मिळून काही मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे. त्यासाठी आधी जन्माला येणाऱ्या बाळाला संभाळण्यासाठी दोघांच्या मनाची तयारी आहे का हे तपासा. कपलची आर्थिक परिस्थिती चांगली असणे गरजेचं आहे. दोघांचा बँक बॅलेन्स इतका असावा की ते दोघेही बाळाची संपूर्ण जबाबदारी स्वत: उचलू शकतील.

काही मुलं आणि मुली दोघेही लग्नाआधी चांगल्या पगाराची नोकरी शोधतात. नोकरीमुळे त्यांचे वय वाढते. वयाच्या ३० व्या वर्षी लग्न केल्यानंतर त्यांना घर, गाडी आणि विविध गोष्टी खरेदी करायच्या किंवा फॉरेन ट्रिप करायच्या असतात. त्यामुळे वयाची पस्तीशी पार होते. तेथून पुढे बाळाला जन्म देताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

बदलती लाईफस्टाईल खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे अनेक महिलांमध्ये पीसीओडी ही समस्या फार सामान्य झाली आहे. आजकाल १० पैकी ८ मुलींना ही समस्या असते. तसेत काही महिलांना कामाचा, नात्याचा ताण तणाव सहन करावा लागतो. त्यामुळे त्या मद्यपान, धूम्रपान देखील करतात. त्यामुळे पोटात बाळ असताना याचा थेट परिणाम बाळावर सुद्धा होतो.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. प्रेग्नेंसीच्या या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com