World TB Day 2023
World TB Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

World TB Day 2023 : 'या' आजारामुळे 4 पट अधिक बळकावू शकतो टीबीचा धोका ! वेळीच व्हा सावध

कोमल दामुद्रे

Diabetes Health : जागतिक क्षय दिवस दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो. जर एखाद्या व्यक्तीला क्षयरोग झाला तर त्यावर निदान 6 महिने तरी उपचार करावे लागतात. 6 महिने सतत औषधे घेतल्याने हा आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते.

या आजारावर वेळीच उपचार केल्यास हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे परंतु, आजही हा आजार जगासाठी चिंतेचा विषय आहे. डॉक्टरांचे (Doctor) म्हणणे आहे की, हा आजार अशा लोकांसाठी अधिक धोकादायक आहे, ज्यांना आधीच इतर काही आजार असतील. यामध्ये कोणती रुग्ण येतात हे जाणून घेऊया.

1. यामध्ये मधुमेहाचा (Diabetes) धोका 4 पट जास्त असतो

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांच्यामध्ये टीबी होण्याचा धोका निरोगी लोकांच्या तुलनेत 4 पटीने वाढतो. त्याचबरोबर ज्या लोकांना टीबीची लागण झाली आहे. ज्यामध्ये 30 टक्क्यांपर्यंत मधुमेह होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मधुमेह आणि क्षयरोग यांचा परस्पर संबंध असतो. या दोन्ही आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

2. स्थिती

टीबी निःसंशयपणे 100% बरा होऊ शकतो. पण तरीही जगासाठी धोका कायम आहे. वर्षाला सुमारे एक ते दोन दशलक्ष लोक त्याला बळी पडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला टीबीमुक्त देश बनवण्याची कसरत सुरू झाली आहे.

3. टीबीची लक्षणे (Symptoms) कोणती?

इतर आजारांप्रमाणेच टीबीमध्येही लक्षणे असतात. त्यांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे. जे लोक टीबीच्या विळख्यात येतात. त्यात थकवा आणि अशक्तपणा, वजन कमी होणे, खूप ताप, छातीत दुखणे, सततचा खोकला, खोकला रक्त येणे यांचा समावेश होतो. उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT