World sickle cell day 2022  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जागतिक सिकल सेल डिझिज दिवस: याविषयी राज्यामध्ये जागरुकता कशी वाढवाल ?

सिकल सेल आजारांविषयी लहानपणी जाहिरात किंवा रेडिओच्या माध्यमातून आपण ऐकलेच असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सिकल सेल डिझिज हा अनुवांशिक रक्तविकाराचा आजार असून भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान आहे. दरवर्षी १९ जून हा दिवस 'जागतिक सिकल सेल दिवस' म्हणून पाळला जातो.

हे देखील पहा -

सिकल सेल आजारांविषयी लहानपणी जाहिरात किंवा रेडिओच्या माध्यमातून आपण ऐकलेच असेल. हा आजार कसा होतो? कोणाला होतो? हा आजार झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? हे आपल्याला माहित नसते. वारंवार उद्भवणाऱ्या दुखण्यामुळे शरीर दुबळे होते व त्यामुळे आपल्याला रक्तप्रवाहातील संसर्ग किंवा स्ट्रोक सारखे आजार होऊ शकतात. ह्या आजारांने ग्रस्त हा नायजेरियानंतरचा दुस-या क्रमांकाचा देश भारत (India) असल्याचा अंदाज आहे.

सिकल सेल डिझिज हा आजार आदिवासी लोकसंख्येमध्ये एससीटीचे अंदाजे १.८ कोटी रुग्ण तर एससीडीचे अंदाजे १४ लाख रुग्ण असण्याची शक्यता आहे. आदिवासी कामकाज मंत्रालयाच्या माहितीनुसार आदिवासी भागात जन्माला येणाऱ्या प्रत्येक ८६ बाळांपैकी १ तरी बाळ (Baby) ह्या आजारांने ग्रस्त असते. सिकल सेल आजार वाढत असल्यामुळे आदिवासी भागातील रुग्णांना योग्य आरोग्यसेवा मिळावी यांसाठी एमओटीएने सिकल सेल डिजिज सपोर्ट कॉर्नरची स्थापना केली.

या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य परिषदेने नवजात बालकांची तपासणी, उपचार आणि सिकल सेल आजाराच्या रुग्णांचे समुपदेशन तसेच विवाह समुपदेशन आणि पालकांमधील आजाराचे निदान अशा मार्गांनी आजारास प्रतिबंध करणे अशा काही शिफारशी केल्या.

तज्ज्ञांच्या मते सिकल सेल आजाराविषयी जागरुकता वाढावी यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक सकारात्मक उपक्रम होत आहे. परंतु, या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आणखीही खूप प्रयत्न गरजेचे आहे. या आजाराचे निदान ओळखून येणाऱ्या पिढीला कसे संक्रमित होण्यापासून वाचवायचे हे महत्त्वाचे आहे. या आजाराविषयी जागरुकता वाढली तर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळखता येईल व त्यावर उपचार सुरू करता येतील.

एससीडीची समस्या हाताळण्यासाठी भारताने २०१८ मध्ये एक राष्ट्रस्तरीय धोरण तयार केले आहे, ज्यात हिमेफायलिया आणि थॅलेसेमिया यांसह सिकल सेल आजारासारख्या हिमोग्लोबिनोपॅथीजच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना आखून देण्यात आल्या आहेत. हे धोरण राष्ट्रीय स्तरावर अंमलात आल्यावर ते राज्य स्तरावर त्याच्या उपयोग करता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT