ऑटिझम म्हणजे काय? त्याची समस्या व लक्षणे कोणती?

मूल कसे वाढवायचे, त्याचे संगोपन कसे करायचे, हा आजार नेमका कसा होतो हे जाणून घेऊया.
Autism pride day 2022, What is autism
Autism pride day 2022, What is autismब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : लग्न झाल्यानंतर काही काळाने आपण बाळाचा विचार करतो. आपले बाळ सृदुढ व निरोगी असावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते.

हे देखील पहा -

जन्मलेल्या बालकाला काही विकार असतील, तर आधी उपचार करावे लागतात. स्वमग्नता किंवा ऑटिझम हा एक असा विकार आहे आणि तो आपल्याला बाळाला झाला असे कळल्यावर पालकांना नैराश्य येऊ लागते. अशावेळी मुलं कसे वाढवायचे यांची चिंता त्यांना वाटू लागते. मूल कसे वाढवायचे, त्याचे संगोपन कसे करायचे, हा आजार नेमका कसा होतो हे जाणून घेऊया.

ऑटिझम म्हणजे काय?

'ऑटिझम' हा एक आनुवंशिक विकार असून, तो गर्भावस्थेतच होत असल्यामुळे तो रोखण्याचे इलाज नाही. हा आयुष्यभर राहणारा विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दर १६० मुलांमागे एक मूल 'ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर' (autism spectrum disorder) झालेले असते. या विकाराची लक्षणे लहान वयापासून दिसत असली, तरी उपचार सुरू करण्यास मात्र वेळ लागतो.

Autism pride day 2022, What is autism
पावसाळ्यात त्वचेची काळजी अशा पध्दतीने घ्या

लक्षणे -

ऑटिझम हा एक मानसिक विकार असून, यात मेंदूचे विविध भाग समन्वयाने कार्य करु शकत नाहीत. या विकाराने ग्रस्त असलेली मुले इतर मुलांपेक्षा वेगळे काही ऐकतात आणि एकाच घटनेबाबत त्यांना वेगळे काही वाटते. इतर मुलांपेक्षा यांचे वागणे वेगळे असते, त्यांना बोलण्यातही अडथळे येतात. आपल्याच जगात रमणे, डोळ्यांना डोळे न भिडविणे, आपले म्हणणे दुसऱ्यांना पटविता न येणे, नाव घेतल्यावर उत्तर न देणे, एकच बाब वारंवार करणे, जीवनशैलीत थोडा बदल झाला तरी अस्वस्थ होणे, आपले म्हणणे योग्य प्रकारे मांडता येणे अशी अन्य लक्षणेही असतात.

समस्या (Problems) -

हा विकार झालेल्या मुलांमधील लक्षणे वेगवेगळी असतात. ऑटिझम विकाराच्या तीन पातळ्या असतात. पहिली असते सौम्य, दुसरी मध्यम आणि तिसरी गंभीर असते. सौम्य विकार असलेल्या मुलांना सर्वात कमी त्रास होतो त्यांच्यात लक्षणेही कमी असतात आणि थोड्या प्रशिक्षणानंतर अशी मुले (Child) सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. गंभीर स्थितीत मुलांची अवस्था नाजूक असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com