World Pneumonia Day 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

World Pneumonia Day 2022 : न्यूमोनिया कसा होतो ? यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? जाणून घ्या, त्याची लक्षणे

न्यूमोनिया या आजाराबाबत जागरुकता वाढावी यासाठी दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी जागतिक न्यूमोनिया दिवस साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

World Pneumonia Day 2022 : न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संक्रमण आजार असून त्यामध्ये फुफ्फुसांच्या अल्व्हेली नावाच्या वायुकोशात द्रव्य किंवा पूचा संचय होतो. हे एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना प्रभावित करु शकते. याचे अनेक कारणे आहेत ज्यात जिवाणू, बुरशी, विषाणू आणि इतर सामान्य प्रकारचे संक्रमण आहे.

न्यूमोनिया हा एक प्राणघातक आजार आहे, ज्याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबाबत जागरुकता वाढावी यासाठी दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी जागतिक न्यूमोनिया दिवस साजरा केला जातो. हा फुफ्फुसाचा एक सामान्य संसर्ग आहे, जो बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे होऊ शकतो. हा आजार सामान्य आहे यामुळे त्याला दुर्लक्ष केले जाते. न्यूमोनियामुळे दरवर्षी अनेकांचा बळी जातो. विशेषत: कोरोना (Corona) विषाणूच्या या युगात, जिथे हा विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. कोविड-19 मुळे अनेकांना न्यूमोनिया देखील झाला, ज्यामुळे त्यांचे बरे होणे कठीण झाले.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात निमोनियामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. असे सांगण्यात आले परंतु, न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर एक महिन्यानंतर धोका वाढतो, जो दशकभर टिकतो. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित लक्षणांबद्दल.

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा हृदयविकाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे. जेव्हा आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ तयार होतात. विशेषत: हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये ते विकसित होते.

आहार, जीवनशैली आणि अनुवांशिकता यासह विविध कारणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल तयार होते. रक्तवाहिन्यांमध्ये कोणताही पदार्थ साचणे धोकादायक आहे कारण ते हृदय आणि इतर अवयवांना रक्त प्रवाह अवरोधित करते. रक्तपुरवठा थांबल्याने स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येतो.

न्यूमोनिया आणि हृदयविकाराचा काय संबंध आहे?

न्यूमोनिया हा एक संसर्ग आहे ज्यामुळे संपूर्ण शरीरात जळजळ होते. जळजळ हृदयविकाराच्या झटक्यासह इतर समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

हा धोका फक्त हृदयाच्या रुग्णांनाच शक्य आहे का?

हा धोका केवळ हृदयाच्या रुग्णांपुरता मर्यादित नाही. न्यूमोनियामुळे संपूर्ण शरीरात जळजळ होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जळजळ आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या प्रणालींच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते - विशेषतः हृदय. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका हा न्यूमोनियाच्या सर्वात सामान्य गुंतागुंतांपैकी एक बनतो.

हृदयविकाराच्या झटक्याशी न्यूमोनियाची लक्षणे कशी असू शकतात?

1. रुग्णाला दीर्घकाळ ICU मध्ये भरती करावे लागते.

2. ज्या रुग्णांची 30% फुफ्फुसे प्रभावित आहेत.

3. ज्या रुग्णांचा रक्तदाब कमी होतो.

4. ज्या रुग्णांना जास्त दाह आहे.

5. जे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT