#WorldPhotographyDay | जागतिक फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या Saam Tv news
लाईफस्टाईल

#WorldPhotographyDay | जागतिक फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोटो काढणं कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला फोटोग्राफी येत नसली तरी फोटो काढणं मात्र प्रत्येकालाच आवडतं. हजार शब्दांपेक्षा एक फोटो जास्त बोलका असतो असं म्हटलं जातं ते उगाच नाही. कारण फोटोंच्या माध्यामातून आपण भुतकाळात एकप्रकारे डोकावू शकतो. इतिहासातील अनेक महत्वपुर्ण घटना आपल्याला फोटोमुळेच समजतात. त्यामुळे मानवी समाजात फोटो आणि कॅमेऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. फोटोग्राफर्सना उत्तम फोटो काढण्यासाठी प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. (World Photography Day 2021)

जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरवात

फ्रान्समध्ये १८३७ साली जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे नावाच्या दोन फ्रेंच लोकांनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने ९ जानेवारी १८३७ रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. त्यानंतर १० दिवसांनी फ्रेंच सरकारने या आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून दिले कॉपीराइट न ठेवता दिले.

फ्रेंच आविष्कार व्यावसायिक फोटोग्राफीची सुरुवात असल्याचे मानले जात असताना, १८३९ मध्ये विल्यम हेन्री फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. फ्रेंच सरकारने ९ जानेवारी १८३७ मध्ये या टेक्निकसाठी पेटंट नोंदवले व फोटोग्राफर्स डे दिवस सुरू करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे १९ ऑगस्ट १८३९ मध्ये जागतिक फोटोग्राफी डे सुरू झाला.

#WorldPhotographyDay ह्या वर्षीची थीम

वर्ल्ड फोटोग्राफी डे वेबसाइटनुसार यंदा Pandemic lockdown through the lens म्हणजेच लेंसच्या माध्यमातून महामारीचं लॉकडाऊन अशी थीम आहे. #WorldPhotographyDay चे 10 लाख टॅग्स बनवण्याची योजना आहे. या हॅशटॅगसह जास्तीत जास्त फोटो शेअर करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

जगातील पहिला सेल्फी

जगातील पहिला सेल्फी

फोटोग्राफीची आवड असणारे अमेरिकेतील रॉबर्ट कॉर्नेलियस यांनी जगातील पहिला सेल्फी काढला होता. त्यांनी हा सेल्फी 1839 मध्ये काढला होता. हा सेल्फी यूनाइटेड स्टेट लाइब्रेरी ऑफ कांग्रेस प्रिंटमध्ये उपलब्ध आहे.

जगात सर्वात जास्त लाईक्स मिळालेला फोटो

जगातील सर्वात जास्त लाईस्क मिळावणारा फोटो एक कोंबडीचे अंडे आहे. तपकिरी रंगांतील अंडी, त्यावर एकही डाग नाही. या अंड्याने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट मिळवले आहेत. आज या फोटोला 55 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT