World Ozone Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

World Ozone Day 2023 : मानवी जीवनाच्या सुरक्षेसाठी ओझोन थराचं महत्व काय? आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

World Ozone Day : आपला ओझोन थर वाचवण्यासाठी सर्व देशांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो.

Shraddha Thik

Importance Of Ozone Day :

समजा, घराचे छत हरवले किंवा तुटले तर काय होईल? ऊन, पाऊस आणि थंडीचा थेट फटका तुम्हाला बसेल. एखाद्याला आजारी पाडण्यासाठी किंवा मारण्यासाठी हे पुरेसे असू शकते. ज्याप्रमाणे छप्पर तुमचे रक्षण करण्याचे काम करते, त्याचप्रमाणे ओझोनचा थर देखील आपल्या पृथ्वीला सौर किरणांपासून वाचवण्याचे काम करतो. आपल्या जीवनातील ओझोन थराचे महत्त्व समजून घेण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय (International) ओझोन थर संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

आपला ओझोन थर वाचवण्यासाठी सर्व देशांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. या दिवशी लोकांना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक केले जाते. ओझोन  पृथ्वीसाठी एक प्रकारचे ढाल म्हणून काम करते, तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कार्य करते.

ओझोन थर म्हणजे काय?

ओझोन, रासायनिकदृष्ट्या O3 म्हणून दर्शविले जाते, ऑक्सिजनच्या अणूंनी बनलेले आहे. ओझोन हा हलका निळा, जीवघेणा, दुर्गंधीयुक्त आणि अत्यंत प्रतिक्रियाशील वायू आहे जो स्ट्रॅटोस्फियरमध्ये जास्त प्रमाणात असतो. ओझोनचे प्रमाण खूप जास्त असल्याने ते हानिकारक होण्याऐवजी आपल्यासाठी फायदेशीर (Benefits) ठरते. जर ते पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ असते, तर त्याचा हरितगृह परिणाम आपल्यासाठी हानिकारक असेल, ज्यामुळे ग्लोबल वार्मिंग आणि इतर संबंधित आपत्ती होतील.

थीम

2023 मधील जागतिक ओझोन दिनाची थीम "मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ओझोन स्तर निश्चित करणे आणि हवामान बदल कमी करणे" अशी ठेवण्यात आली आहे. ही थीम हवामान बदलावरील मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या यशस्वी प्रभावाचा पुनरुच्चार करते. यामध्ये हायड्रोफ्लुरोकार्बनसारख्या पदार्थाचा वापर टप्प्याटप्प्याने पण निश्चितपणे संपुष्टात आला.

ओझोन थरातील छिद्र

ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 22 मैल उंचीवर वातावरणातील 'स्ट्रॅटोस्फियरच्या खाल'च्या भागात आहे. त्याची जाडी सर्वत्र सारखी नसते. विषुववृत्ताच्या वर ते सर्वात जाड असले तरी ध्रुवावर ते सर्वात पातळ आहे.

1970 च्या दशकातच, शास्त्रज्ज्ञांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले होते की अंटार्क्टिकावर ओझोनचा ऱ्हास होत आहे आणि त्यासाठी अंटार्क्टिकाच्या विशेष हवामान (Weather) प्रक्रियेसह क्लोरोफ्लोरो कार्बन आणि तत्सम काही प्रदूषक जबाबदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT