आंतरराष्ट्रीय ओझोन दिन: जाणून घ्या काय आहे ओझोन लेयरचे महत्व...

शाळेत असताना पर्यावरणाच्या तासाला आपण ओझोन लेयरबद्दल नक्कीच ऐकलं असेल. सुर्याच्या अतिनील किरणांपासून सजीवांचे संरक्षण करणाऱ्या वायुला ओझोन लेयर असं म्हणतात.
आंतरराष्ट्रीय ओझोन दिन: जाणून घ्या काय आहे ओझोन लेयरचे महत्व...
आंतरराष्ट्रीय ओझोन दिन: जाणून घ्या काय आहे ओझोन लेयरचे महत्व...Saam Tv News
Published On

शाळेत असताना पर्यावरणाच्या तासाला आपण ओझोन लेयरबद्दल नक्कीच ऐकलं असेल. सुर्याच्या अतिनील किरणांपासून सजीवांचे संरक्षण करणाऱ्या वायुला ओझोन लेयर असं म्हणतात. ओझोन लेयर म्हणजे ओझोन या वायूचा थर हा पृथ्वीपासून १६ ते ५० किमीच्या पट्ट्यात आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीनसारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो. ओझोन लेयर हा सजीवांसाठी महत्वाचा असल्याने संयुक्त राष्ट्र संघाने याबाबात जनजागृती करण्यासाठी ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Preservation of the Ozone Layer) हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. (International Ozone Day: Learn What The Importance Of The Ozone Layer Is ...)

हे देखील पहा -

आंतरराष्ट्रीय ओझोन दिनाचा इतिहास

व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला 28 देशांनी मान्यता दिली आणि 22 मार्च 1985 ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. सप्टेंबर 1987 मध्ये ओझोन लेअर कमी करणार्‍या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला आणि16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी 15 ऑक्टोबर 2016 मध्ये रवांडा येथील किगाली येथे 28 व्या बैठकीदरम्यान हायड्रोफ्लुरोकार्बनची पातळी खाली आणण्यासंबंधी करार केला. हा करार किगाली करार म्हणूनही ओळखला जातो.

आंतरराष्ट्रीय ओझोन दिन: जाणून घ्या काय आहे ओझोन लेयरचे महत्व...
फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगुन ट्रक पळवणाऱ्या ५ आरोपींना अटक

ओझोन लेयर वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१) वायू प्रदुषण कमी करणे - वायू प्रदुषणामुळे आणि कार्बनडायऑक्साईडमुळे ओझोन थराला हानी पोहोचते. ते टाळ्यासाठी आवश्यक नसताना खासगी वाहने वापरणे थांबवावीत. दुचाकी वापरणे हा सर्वात सोयीचा मार्ग आहे. किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि शक्य असल्यास सायकलचा वापर करणे.

२) पर्यावरणपुरक उत्पादनांवर भर देणे - प्लास्टिकच्या कपड्याऐवजी कापडी पिशवी वापरणे, ग्रीन एनर्जी, बायोगॅस इत्यादींचा वापर करणे.

३) वस्तूंचा पुनर्वापर करणे - जुन्या वस्तू फेकुन देण्यापेक्षा त्यांचा दुसरा काही अन्या उपयोग आहे का ते तपासून टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेनुसार वस्तुंचा पुनर्वापर करणे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com