मुंबई : आपल्यापैकी सगळ्यांना संगीत आवडते. संगीताशी आपला काहीही संबंध नसला तरी आपल्या ओठावर आपण ते सतत गुणगुणत असतो. कुठल्याही क्षणीही संगीत ऐकली की, आपण त्यावर ठेका घ्यायला सुरुवात करतो.
हे देखील पहा -
आज २१ जून जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जात आहे पण आजच्या दिवशी जागतिक संगीत दिनही तितक्याच उत्साहात साजरा केला जाईल. तरूण कलाकारांमध्ये किंवा संगीताची आवड असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हा 'जागतिक संगीत दिन' साजरा केला जातो.
इतिहास
ज्या क्षणापासून नादाची निर्मिती झाली त्या क्षणापासून संगीत निर्माण झाले. संगीताचे स्वर व त्याचे प्रकार वेगवेगळे आहे. या दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली असून 'फेटे डेला म्युसिक्यू' या नावाने फ्रान्समध्ये ओळखले जाते. २१ जून १९८२ पहिल्यांदा जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला. ज्याचे आयोजन फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री जॅक लाँग यांनी केले होते.
महत्त्व
जगभरातील संगीतकार आणि संगीतप्रेमींच्या जीवनात जागतिक संगीत दिनाचे खूप महत्त्व आहे. यानिमित्ताने सार्वजनिक ठिकाणी संगीत सादरीकरण केले जाते. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि स्थानिक कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संगीत ऐकण्याचे फायदे (Benefits)
१. संगीत ऐकल्याने स्मरणशक्ती सुधारते.
२. संगीत ऐकल्याने आपल्या मेंदूमध्ये अनेक बदल होते. जे आपल्या मेंदूच्या कार्यासाठी व मानसिक आरोग्यासाठी चांगले असते.
३. संगीत ऐकल्याने आपल्या मनावर परिणाम होतो ज्यामुळे आपल्याला शांत राहण्यास मदत होते.
४. रात्री गाणी ऐकल्याने झोप चांगली लागते व त्याचे आरोग्याला (Health) अनेक फायदे होतात.
५. गाणी ऐकल्याने नैराश्य कमी होते तसेच हृदयाच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. गाणी ऐकल्याने श्वासोच्छवासाची गती, हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.