आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२: जाणून घ्या महत्त्व, इतिहास व थीम

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अधिक महत्त्वाचा आहे.
International Yoga Day 2022, Yoga benefit
International Yoga Day 2022, Yoga benefitब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अधिक महत्त्वाचा आहे. योग केल्याने आपल्याला प्रसन्न तर वाटतेच आणि इतर अनेक समस्यांपासून आपली सुटका देखील होते.

हे देखील पहा -

वाढलेले वजन कमी (weight loss) करण्यासाठी किंवा आपण फिट दिसण्यासाठी योग करत असतो. योग केल्याने आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करुनही ते कमी होत नाही. आहारात (Food) बदल करुनही शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाही.त्यासाठी योगचे महत्त्व सांगण्यासाठी व त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी थीम ठेवली जाते. यंदा साजरा होणारा योग दिवस हा ८ व्या आवृत्तीची थीम असून 'मानवतेसाठी योग' असा आहे. ही थीम ठरवण्यात आली असून जगभरात 'मानवतेसाठी योग' या थीमवर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यंदा आयुष मंत्रालयाने २१ जून रोजी जगभरात योग दिनाची ही थीम निवडली आहे.

इतिहास

संयुक्त राष्ट्र महासभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी जागतिक योग दिवस २१ जून रोजी साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली होती. त्यानंतर २०१५ साली हा योग दिवस २१ जून रोजी जगभरात साजरा करण्यात आला. हा दिवस आजही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

International Yoga Day 2022, Yoga benefit
चाळिशी ओलांडताना शरीराचे ओझे नसावे !

योग दिवस २१ जूनलाच का साजरा केला जातो?

२१ जून हा दिवस ३६५ दिवसांपैकी सर्वात मोठा दिवस समजला जातो. या दिवशी सूर्य लवकर उगवतो व उशिरा मावळतो तसेच या दिवशी सूर्याची ऊर्जा सर्वात जास्त प्रभावी असते जी आपल्या शरीरातील सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते.

महत्त्व -

यंदाच्या योग दिनी 'गार्डियन रिंग' आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. ज्या देशातून सूर्य उगवतो त्या देशातून या दिवसाची सुरुवात होईल. लहान मुले, प्रौढ, स्त्रिया आणि पुरुष, प्रत्येकाला योग केल्याने फायदा होतो. नियमित योगासने केल्याने शरीर रोगमुक्त होते. तणाव आणि तणाव देखील दूर होतो. रक्त परिसंचरण आणि पचन सुधारते. मात्र, योगा करताना योगाभ्यासाशी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com