Mahashivratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2023 : 'हे' आहे जगातील सगळ्यात उंच असे शिवमंदिर, जाणून घ्या

Shivratri Puja : भारतात असे अनेक शिवमंदिरे आहेत ज्यांचा इतिहास खूप खोल आहे.

कोमल दामुद्रे

World Largest Shivmandir : महाशिवरात्रीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करतात. लोक या शुभ दिवशी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतात. भारतात असे अनेक शिवमंदिरे आहेत ज्यांचा इतिहास खूप खोल आहे.

पौराणिक कथा या मंदिरांशी जोडल्या गेल्या आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, या मंदिरांच्या दर्शनाने त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिवमंदिराची माहिती सांगणार आहोत.

त्या शिवमंदिरचे नाव 'जाटोली' असे आहे. हे मंदिर 'हिमाचल' येथे स्थित असून या मंदिराला आशियातील सर्वात उंच शिवमंदिर समजले जाते. महाकालचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात लांबून लोक येतात.

जाटोली हे शिव मंदिर भगवान शिवाचे चमत्कार आणि शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, या मंदिरातील दगडांना थाप दिल्यावर ड्रम सारखा आवाज येतो. चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत शिव मंदिराबद्दल (Temple) संपूर्ण माहिती.

1. महाशिवरात्रीला येथे भाविकांची जत्रा जमते

आशिया खंडातील जाटोली हे शिवमंदिर सर्वोच्च मानले जाते. जाटोली हे शिवमंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन शहरापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. जाटोली शिवमंदिर दक्षिण द्रविड शैलीत बांधलेल्या मंदिराची इमारत ही एक सुंदर कलाकृती आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर देशभरातून (World) लाखो भाविक येथे गर्दी करतात आणि हर हर महादेव अशा घोषणा देतात.

Mahashivratri 2023

2. शिवमंदिराचे वेगळेपण काय आहे?

असे म्हटले जाते की, या मंदिरात भगवान भोलेनाथ यांनी काही वेळ वास्तव्य केले होते. काही कालावधीनंतर स्वामी कृष्ण परमहंस यांनी येथे तपश्चर्या केली त्यांच्या मार्गदर्शनाने येथे सुंदर शिवमंदिर बांधण्यात आले. हे मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ ३९ वर्ष लागली.

3. भगवान शिव आणि जाटोली

जाटोली मंदिराच्या ठिकाणी पूर्वी लोकांना पाण्याची कमतरता जाणवत होती. या समस्येवर मात करण्यासाठी स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी महादेवाची कठोर तपश्चर्या केल्याने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले त्रिशूल त्या ठिकाणी जमिनीवर आपटले त्यावेळेस तेथून पाणी (Water) बाहेर येऊ लागले. त्या दिवसापासून लोकांना या ठिकाणी पाण्याची कमतरता अजिबात जाणवली नाही.

4. मंदिराची रचना कशी आहे?

आशिया खंडातील सर्वात मोठे जाटोली शिवमंदिरच्याबद्दल सांगायचे झाले तर या मंदिराचे घुमट 111 फूट उंच आहे. शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी शंभर पायऱ्या चढून जावे लागते. शिवमंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक देवी देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या वरच्या बाजूला अकरा फूट उंच सोन्याचा कलश ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या इमारतीवरील सुंदर कलाकृती पाहण्यासारखे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये कार आणि जीपची समोरासमोर धडक; इंजिन 100 फूट लांब उडून पेट्रोल पंपाजवळ पडलं; Photos

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गुळुंचे येथे हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार..

कापसाच्या पिकात गांजाची शेती! नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्षभराची मेहनत मातीमोल! कधी काळी बागायती शेती, आता उजाड माळरान; दुष्काळाने सांगवी गावाची दैना

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पती-पत्नीला मिळणार दरमहा 6,000 रुपये पेन्शन; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT