Mahashivratri 2023 : शिवलिंग कोसळून पुन्हा नव्याने येते एकत्र, अशा 'या' आश्चर्यकारक शिवलिंगाबद्दल जाणून घ्या

Bijali Mahadev : भारतातील हिमाचल हे राज्य आपल्या नैसर्गिक आश्चर्यांसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 Saam Tv

Lord Shiva's Temple : भारतातील हिमाचल हे राज्य आपल्या नैसर्गिक आश्चर्यांसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बर्फाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येत लोक येतात. पण तुम्हाला माहित आहे का, हिमालयाच्या कुल्लूमध्ये असे एक शिवमंदिर आहे ज्याला अतिशय धार्मिक महत्त्व दिले जाते. अशा या रहस्यमय मंदिराबद्दल बहुतेक लोकांना माहीत असेल. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दर वर्षी महाशिवरात्रीला देशभरातून मोठ्या प्रमाणत भाविक येतात.

कुल्लू खोऱ्यातील काशवरी या सुंदर गावात भोलेनाथचे हे मंदिर (Temple) 2460 मीटर उंचीवर वसलेले आहे. भारतातील (India) प्राचीन मंदिरांमध्ये या शिवमंदिरचा समावेश होतो. येथे असलेली शिवलिंग विजेच्या धक्क्याने पूर्णपणे कोसळते असे मानले जाते. पण काही वेळानंतर ते कोसळलेले शिवलिंग पुन्हा एकत्र येते. चला तर मग या शिवमंदिराच्या अद्भुत इतिहासाबद्दल जाणून घेऊ.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 Wishes : महाशिवरात्रीला तुमच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा !

विजेबद्दल जाणून घ्या -

दर बारा वर्षांनी मंदिराच्या आत स्थित असलेल्या शिवलिंगावर वीज पडून शिवलिंगाचे अनेक तुकडे होतात. त्यानंतर मंदिराचे पुजारी प्रत्येक तुकडा एकत्र करतात. काही वेळानंतर शिवलिंग पूर्वीसारखे दिसते. त्यामुळे लोकांचा असा विश्वास आहे, की येथे केलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.

यावर लोकांचे म्हणणे काय आहे?

लोकांचे असे म्हणणे आहे की, येथील प्रमुख देवता परिसरातील लोकांना प्रत्येक वाईट गोष्टींपासून वाचवतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की ही वीज एक दिव्यशक्ती, दैवी वरदान आहे. त्यामुळे येथेल लोक महाशिवरात्रीचा सण खूप धुमधडाक्यात साजरा करतात.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 : 'या' राशींना शंकर भगवान करतील जबरदस्त श्रीमंत, वाचा आजचे राशीभविष्य

पौराणिक कथा -

असे म्हणतात की, एक कुलांत नावाचा राक्षस कुलू खोऱ्यात राहत होता. एके दिवशी अचानक त्याचे रूप बदलले आणि तो महाकाय साप बनला. त्यानंतर तो लाहोल स्थितीच्या माथान गावात पोहोचला.

येथे त्याने ब्यास नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केल्याने गावात पूर आला. हे जेव्हा भगवान महादेवाला समजले तेव्हा ते थांबवण्यासाठी येथे आले आणि काही वेळातच भोलेनाथांनी राक्षसाचा वध केला.

राक्षसांच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराने आजूबाजूचा परिसर व्यापला जो पर्वता सारखा दिसत होता. राक्षसाचा पराभव करून भोलेनाथ इंद्रदेवकडे गेले आणि त्यांना बारा वर्षांनी पर्वतावर वीज पाडण्यास सांगितले.

पण त्या विजेचा स्थानिक लोकांना कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून महादेवाने स्वतःला विजेचा धक्का देण्यास सांगितले. तेव्हापासून दर बारा वर्षांनी शिवलिंगावर वीजा पडतात असे म्हटले जाते.

मंदिरात कसे जायचे -

कुल्लूपासून 20 किलोमीटर अंतरावर हे भगवान भोलेनाथाचे मंदिर आहे. 3 किमीचा ट्रॅक पूर्ण करून तुम्ही येथे पोहोचू शकता. ट्रॅक दरम्यान तुम्हाला नद्या, दऱ्या आणि नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येतो. हे ट्रॅक पर्यटकांसाठी अतिशय मनोरंजक आहे त्यामुळे जगभरातून लोक येथे येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com