World food safety day  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जागतिक अन्न सुरक्षा दिन २०२२ : जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्त्व

प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि पौष्टिक आहार पुरेशा प्रमाणात कसा मिळेल याबाबत जनजागृती करणे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ७ जून हा दिवस दरवर्षी जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश असा की, लोकांमध्ये अन्न सुरक्षतेबाबत जागरुकता पसरवणे व खराब अन्नपदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला हानी कशी होते याविषयी माहिती उपलब्ध करुन देणे.

हे देखील पहा -

प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि पौष्टिक आहार पुरेशा प्रमाणात कसा मिळेल याबाबत जनजागृती करणे. हल्ली फास्ट फूडचा ट्रेंड (Trend) झपाट्याने पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो.

इतिहास

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगातील प्रत्येक १० व्यक्तींपैकी १ तरी व्यक्ती ही खराब अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आजारी पडते ज्यामुळे आपल्या आरोग्याला (Health) धोका निर्माण होतो. डिसेंबर २०१८ साली संयुक्त राष्ट्र महासभेने अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने हा 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यादिवसापासून 'जागतिक आरोग्य संघटना', अन्न आणि कृषी संघटना व या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांच्या मदतीने 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा करण्यात येतो.

महत्त्व

बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाच्या खाण्यापिण्यात बदल होत आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत आपण अगदी बेफिकीरपणे वागतो. त्यासाठी अन्न सुरक्षा असे ठरवते की, अन्नपदार्थ वापरण्यापूर्वी पिकाचे उत्पादन, साठवण आणि वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर शक्य तितके सुरक्षित ठेवले जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील विकसित आणि विकसनशील देशांमध्ये दरवर्षी सुमारे तीस लाख लोक अन्नपदार्थातून झालेल्या रोगांमुळे मरतात.

थीम

दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम ठेवण्यात आली आहे. 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' ही थीम यावर्षी आहे. तसेच जगातील प्रत्येक १० व्यक्तींपैकी १ व्यक्ती ही खराब अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे अनेक आजारांनी ग्रस्त आहे.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT