World Day Against Child labour Saam Tv
लाईफस्टाईल

World Day Against Child labour: १४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवल्यास होऊ शकते कारावासाची शिक्षा; देशात सर्वात जास्त बालमजुर कुठे?जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बालमजुरी ही जगभरातील गंभीर समस्या आहे. लहान मुलांना कामाला लावणे म्हणजे बालमजुरी करणे. बालमजुरी ही लहान मुलांच्या भविण्यासाठी चांगली नसते. लहान मुलांनी बेकायदेशीररित्या राबवणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याचसाठी १२ जून रोजी जगभरात बालकामगार प्रतिबंध दिन साजरा केला जातो.

बालमजुरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे गरीबी. गरीबीमुळे लहान मुलांना कामाला लावले जाते. बालमजुरी रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु तरीही गरीबीमुळे अनेक लहान मुले आजही कामे करतात. बालमजुरी थांबवण्यासाठी कायदादेखील तयार करण्यात आला आहे.

बालमजुरी थांबवणे आणि निर्मुलन करणे हा बालकामगार प्रतिबंध दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देष हे. २००२ साली द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने हा दिन सुरु केला. १४ वर्षांखालील मुलांना बालमजुरी न करुन देणे आणि त्यांना शिक्षण देणे हाच यामागचा उद्देष आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये आजही लहान मुलांना काम करावे लागत आहे.

भारतात बालमजुरीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनॅशनल लेबर ऑग्रगनायझेशनच्या अहवालानुसार, जगभरात १५.२ कोटी मुलांना बालमजुरी करण्यास भाग पाडले जात आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात ग्रामीण भागात सर्वाधिक बालमजुरांची संख्या आहे. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्रा, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक बालमजुर आहेत.

बालकामगार कायदा

जर कोणत्याही व्यक्तीने १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कामावर ठेवले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. भारतीय दंड संहिता १८६०, बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा १९८६ या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. याचसोबत बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायदा २०० अंतर्गत कारवाई होऊ शकते. जर कोणत्याही व्यक्तीने १४ वर्षांखालील मुलाला किंवा १४ ते १८ वयोगटातील मुलाला धोकादायक व्यवसायात कामाला ठेवले तर त्याला २०,००० रुपये आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT